नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचे निकाल हाती येऊ लागले आहेत. आतापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार देशात भाजपप्रणित एनडीएला 343 जागांवर आघाडी मिळाली आहे तर काँग्रेस आघाडीला 89 जागांवर आघाडी मिळाली आहे. 110 जागांवर सपा, बसपासह देशातील इतर पक्ष आणि अपक्ष उमेदवारांना आघाडी मिळाली आहे. महाराष्ट्रातील 48 जागांचा विचार केला तर भाजप 23, शिवसेना 18, राष्ट्रवादी 5, काँग्रेस 1 आणि वंचित आघाडीने एका जागेवर आघाडी मिळवली आहे. देशभरात बहुमत मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.


मोदींनी विजयी झाल्यानंतर ट्वीट करुन त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. ट्वीटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, "सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत" (सर्वांची साथ + सर्वांचा विकास + सर्वांचा विश्वास = विजयी भारत)

मोदींनी त्यानंतर अजून एक ट्वीट करुन देशातील नागरिकांचे आभार मानले आहेत. नागरिकांना उद्देशून मोदींनी म्हटले आहे की, "तुम्ही आमच्यावर आणि आमच्या मित्रपक्षांवर विश्वास ठेवलात याबद्दल सर्व भारतीयांचे आभार. तुमचा हाच विश्वास आम्हाला देशाच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी ताकद देईल."


मोदी म्हणतात की, "मी प्रत्येक भाजप कार्यकर्त्याला त्याच्या परिश्रमांसाठी वंदन करतो. आमचा प्रत्येक कार्यकर्ता मतं मागण्यासाठी लोकांच्या घरोघरी गेला, आमचा अजेंडा लोकांसमोर मांडला. त्यामुळेच आम्ही लोकांपर्यत पोहोचलो."


...म्हणून आम्हाला बहुमत मिळालं : देवेंद्र फडणवीस

Maharashtra Election Results 2019 : महाराष्ट्रात काँग्रेसचं पतन का झालं?

बारामतीत सुप्रिया सुळे जिंकूनही शरद पवारांचा ईव्हीएमवर अविश्वास कायम

महाराष्ट्राचे दोन माजी मुख्यमंत्री पराभूत आणि दोन केंद्रीय मंत्र्यांसह अनेक दिग्गज पराभवाच्या छायेत

मुंबईतल्या सर्व जागा शिवसेना-भाजपने राखल्या?