Maharashtra Assembly Election 2024 भंडारा: पक्ष नेतृत्वानं माझ्यावर पुन्हा एकदा विश्वास दाखवून मला पुन्हा एकदा उमेदवारी दिली. त्यामुळं पक्ष नेतृत्वाचं आणि महायुतीच्या (Mahayuti) नेत्यांचा विश्वास पूर्णपणे सार्थकी लावून विजय संपादन करेल. यासोबतचं भंडारा जिल्ह्यातील महायुतीच्या तिन्ही जागा निवडून आणण्याचा पूर्णपणे प्रयत्न करू. 2019 मध्ये काही नेत्यांमुळं मला तिकीट मिळाली नाही, नाहीतर मी महायुतीचा आमदार राहिलो असतो. 2024 च्या निवडणुकीसाठी मला महाविकास आघाडीकडून (Maha Vikas Aghadi) प्रस्ताव आला पण, मी तो स्वीकारला नसल्याचा गौप्यस्फोट भंडाऱ्याचे आमदार आणि शिवसेनेचे उपनेते आमदार नरेंद्र भोंडेकर (Narendra Bhondekar) यांनी केला आहे. महायुतीकडून निवडणूक लढवण्याचं निश्चित केलं होतं. महायुतीसोबत असल्यानं मला दिलेला शब्द त्यांनी पाळला आणि मला तिकीट दिलं, अशी स्पष्टोक्तीही आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिली आहे.
शिवसेनेच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर, विदर्भातील सहा उमेदवारांची घोषणा
राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष विधानसभा निवडणुकीसाठी (Vidhan Sabha Election 2024) आपल्या उमेदवारांची घोषणा करत आहेत. भाजपाने आतापर्यंत आपल्या 99 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या शिवसेनेनेही 22 ऑक्टोबर रोजी आपल्या उमेदवारांची पहिली यादी सार्वजनिक केली आहे. या यादीत एकूण 45 उमेदवारांचा समावेश आहे. या पहिल्याच यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचादेखील समावेश आहे. तर शिवसेनेच्या पहिल्या उमेदवार यादीत विदर्भातील सहा उमेदवारांची नावं घोषित करण्यात आली आहे. यात यवतमाळच्या दिग्रस येथून विद्यमान आमदार व मंत्री संजय राठोड यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे. बुलढाणामधून संजय गायकवाड, तर मेहकरमधून संजय रायमुलकर यांच्या नावाची शिंदेंच्या सेनेकडून घोषणा झाली आहे.अमरावतीच्या दर्यापूर मतदारसंघातून कॅप्टन अभिजित अडसूळ यांना उमेदवारी मिळाली आहे. अभिजीत अडसूळ हे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे चिरंजीव आहेत. तर रामटेकमधून आमदार आशिष जयस्वाल यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर भंडारामधून आमदार नरेंद्र भोंडेकर यांना शिंदे यांच्या शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर झाली आहे.
पूर्व विदर्भात महायुती 32 जागा लढेल, त्या सर्व जागा जिंकूच!
सर्वसामान्य शिवसैनिकावर उपनेतेपदाची जबाबदारी देणे, हा त्या शिवसैनिकांसाठी सन्मानाची बाब आहे. मंत्रीपदाऐवजी पक्ष संघटनेची जबाबदारी हाचं मोठा सन्मान आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या पद्धतीनं कार्यकर्त्यांना ओळखलं, असं उद्धव ठाकरेंनी ओळखलं असतं तर, आज पक्ष फुटला नसता. सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते, सर्व आमदार एकत्र असते असे म्हणत नरेंद्र भोंडेकर यांनी द्धव ठाकरेंवर टीका केली आहे. तर मी अपक्ष निवडणूक लढविली असती. राजकारणात सर्वचं पत्ते उघडायचे नसतात. भाजप मला प्रिय पक्ष आहे. भाजपमध्ये पूर्वीसारखीच सर्वांशी संबंध आहेत. महायुतीच्या तिन्ही पक्षासोबत समन्वय साधून जिल्ह्यातील तिन्ही जागा निवडून आणू.किंबहुना पूर्व विदर्भात महायुती 32 जागा लढतील आणि सर्वच्या सर्व जागा निवडून आणणार. त्यासाठी महायुतीच्या नेत्यांनी मोठा प्लॅन तयार केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसचा फुगा नक्कीच फोडणार, असा निर्धारही त्यांनी बोलून दाखवला आहे.
हे ही वाचा