मुंबई : सिनेमाच्या तिकीटबारीप्रमाणे यंदा लोकसभेच्या तिकीटबारीवर सेलिब्रिटींची गर्दी होताना दिसतेय. कारण अभिनेत्री उर्मिला मातोंडकर काँग्रेसच्या बाजूनं मुंबईतून निवडणूक लढवेल, अशी सूत्रांची माहिती आहे. उर्मिला मातोंडकरांचा लवकरच पक्षप्रवेश होणार असून उत्तर मुंबईतून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. उत्तर मुंबईत भाजपचे गोपाळ शेट्टी तगडे उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात एका तगड्या उमेदवाराच्या शोधात काँग्रेस होती. त्यामुळेच उर्मिलाला उमेदवारी देण्याचा विचार काँग्रेस करत आहे. याआधी काँग्रेसकडून याठिकाणी आसावरी जोशी, शिल्पा शिंदे यांचीही नावं चर्चेत होती. उत्तर पश्चिम मुंबईतून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरूपमांना उमेदवारी मिळणार असल्य़ाची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस पक्षातून निरुपम यांच्या उमेदवारीला विरोध होता. पण राहुल गांधींनी निरुपम यांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतल्य़ाची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

काँग्रेसची उमेदवार यादी

  1. नंदुरबार - के. सी. पडवी
  2. धुळे - कुणाल रोहिदास पाटील
  3. वर्धा - चारुलता टोकस
  4. मुंबई दक्षिण मध्य - एकनाथ गायकवाड
  5. यवतमाळ-वाशिम - माणिकराव ठाकरे
  6. शिर्डी- भाऊसाहेब कांबळे
  7. रत्नागिरी-सिंधुदुर्ग - नवीनचंद्र बांदिवडेकर
  8. नागपूर - नाना पटोले
  9. सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
  10. मुंबई उत्तर-मध्य - प्रिया दत्त
  11. मुंबई दक्षिण - मिलिंद देवरा
  12. गडचिरोली-चिमूर - डॉ. नामदेव उसेंडी
  13. चंद्रपूर- सुरेश (बाळू) धानोरकर
  14. जालना- विलास औताडे
  15. औरंगाबाद- सुभाष झांबड
  16. भिवंडी - सुरेश टावरे
  17. लातूर- मच्छिंद्र कामनात
  18. नांदेड- अशोक चव्हाण
  19. रामटेक- किशोर गजभिये
  20. हिंगोली- सुभाष वानखेडे
  21. अकोला- हिदायत पटेल
संबंधित बातम्या

काँग्रेसकडून उमेदवारांची आठवी यादी जाहीर, नांदेड लोकसभेसाठी अखेर अशोक चव्हाणांनाच उमेदवारी

लोकसभा निवडणूक : काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील पाच उमेदवारांची घोषणा

लोकसभा निवडणूक : भाजपची दुसरी यादी जाहीर, महाराष्ट्रातील चार विद्यमान खासदारांचा पत्ता कट

लोकसभेसाठी शिवसेनेची पहिली यादी, महाराष्ट्रातील 21 उमेदवार जाहीर

भाजपची पहिली उमेदवार यादी जाहीर, महाराष्ट्रातील 16 उमेदवारांची घोषणा

काँग्रेसची दुसरी उमेदवार यादी जाहीर, माणिकरावांसह एकनाथ गायकवाडांना उमेदवारी

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादीची दुसरी उमेदवारी यादी जाहीर, मावळमधून पार्थ पवार तर शिरुरमधून अमोल कोल्हे मैदानात

लोकसभा निवडणूक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणूक : काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील 5 उमेदवार, नागपुरात गडकरी विरुद्ध पटोले लढत रंगणार