मुंबई : 'बिग बॉस'च्या दहाव्या पर्वाची विजेती ठरलेली मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने राजकारणात पाऊल ठेवलं आहे. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्या उपस्थितीत शिल्पा शिंदेने काँग्रेसमध्ये प्रवेश केला.


'भाभी जी घर पर है' या मालिकेतील अंगुरी भाभीच्या व्यक्तिरेखेमुळे शिल्पा शिंदे प्रसिद्धीच्या झोतात आली होती. त्यानंतर बिग बॉसच्या दहाव्या पर्वात प्रवेश केल्यावर ती अनेक प्रेक्षकांची फेवरेट ठरली होती. बिग बॉसच्या घरातील हीना खानसोबतच्या तुंबळ युद्धात तिचं पारडं कायम जड राहिलं होतं. त्यानंतर बिग बॉसच्या विजेतेपदामुळे तिच्या लोकप्रियतेवर शिक्कामोर्तब झालं.
BIG BOSS 11 : शिल्पा शिंदे विजेती, हीना खानवर मात

शिल्पा लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेस प्रवेश करत असल्यामुळे ती निवडणुकांच्या रिंगणात उतरणार, की स्टार प्रचारक होणार, हे येत्या काळात समजेल. मात्र काँग्रेस तिच्या लोकप्रियतेचा लाभ करुन घेणार, यात शंका नाही.



वादविवाद आणि शिल्पा

मराठीद्वेष्टेपणा

'मराठीमध्ये बहुसंख्य कलाकार खूप उत्तम काम करतात. मात्र मराठी कलाकारांमध्ये अहंकार, मीपणा जास्त आहे. मै नही करुंगा...... असं त्यांचं वागणं असतं... मराठी लोगोंमे वही प्रॉब्लेम है' असं म्हणणाऱ्या शिल्पा शिंदेच्या मराठीद्वेष्टेपणाबद्दल टीका झाली होती.

भाभीजी सोडण्याचा निर्णय

शिल्पा शिंदेला इतर मालिकांमध्ये काम करण्यास मज्जाव केल्यामुळे तिने 'भाभीजी...' सीरियल सोडण्याचा निर्णय घेतला होता. “प्रॉडक्शन टीमचे लोक सारखे त्रास देतात. आणि काही जण करिअर संपवण्याची धमकीही देतात.” असा आरोप शिल्पाने केला होता.
मराठी कलाकार उत्तम, पण त्यांना 'मी' पणा जास्त : शिल्पा शिंदे

तिच्या 'अनप्रोफेशनल वागणुकी'विरोधात निर्माता बिनफेर कोहली यांनी सिन्टामध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर सिन्टाने नॉन कॉर्पोरेशन सर्क्युलर काढण्याचा निर्णय घेतला. या सर्क्युलरमध्ये भविष्यात शिल्पा कोणत्याही चॅनल किंवा निर्मात्यांसोबत काम करु शकणार नसल्याचा उल्लेख होता.