उर्मिला मातोंडकरची जंगम मालमत्ता 41 कोटी रुपयांच्या घरात आहे. यामध्ये शेअर्स, बाँड, म्युचुअल फंड (28.28 कोटी) यांचा समावेश आहे. याशिवाय उर्मिलाकडे एक मर्सिडीज कारही आहे.
उर्मिलाच्या स्थावर मालमत्तेमध्ये वांद्रे परिसराती चार फ्लॅट्सचा समावेश होतो. सध्याच्या बाजारभावानुसार या फ्लॅट्सची किंमत 27.34 कोटी रुपये होते.
ठाणे जिल्ह्यातील वसईमध्ये उर्मिला मातोंडकरच्या नावे दहा एकर जमीन आहे. याची किंमत सद्यकालीन दरानुसार एक कोटी 68 लाख रुपयांच्या आसपास आहे.
VIDEO | प्रचारादरम्यान उर्मिला मातोंडकरने विद्यार्थ्यांसाठी गायलं गाणं | मुंबई | एबीपी माझा
उर्मिलाच्या शिक्षणाबाबत वाचून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. उर्मिलाने तिचं पदवी शिक्षणही पूर्ण केलेलं नाही. तिने मुंबईतील प्रसिद्ध डी. जी. रुपारेल महाविद्यालयात शिक्षण घेतलं, मात्र द्वितीय वर्षानंतर (SYBA) तिने शिक्षण सोडून दिलं. उर्मिलाच्या विरोधात कोणताही गुन्हा नोंद नाही.
उमेदवारी अर्ज भरताना उर्मिला मातोंडकरचे पती मोहसीन मीरही तिच्यासोबत होते. दोघं जण बाईकवरुन वांद्र्यात आले. उर्मिलाचे पती मोहसीन यांच्या नावे 35 लाख रुपयांचं फिक्स डिपॉझिट आहे. दुसऱ्या अकाऊण्टमध्ये पाच लाख रुपयांचा समावेश आहे, तर 15 हजारांची रोकड आहे.
उर्मिलाचा सामना भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या विरोधात होणार आहे. 2014 साली गोपाळ शेट्टींनी काँग्रेस उमेदवार संजय निरुपम यांचा साडेचार लाखांच्या मताधिक्याने पराभव केला होता.
VIDEO | भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांना अभिनेत्री उर्मिला मातोंडकर टक्कर देणार | मुंबई | एबीपी माझा