रत्नागिरी : राज्यात विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारसभांसाठी महाराष्ट्र फिरत आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही विदर्भ, मराठवाड्यानंतर आता कोकणातील प्रचारसभांना सुरुवात केली आहे. राज ठाकरेंच्या सभांसाठी जिल्ह्यातून, विविध मतदारसंघातून मनसैनिक सभेला गर्दी करतात, मोठ्या उत्साहात गाड्या घेऊन सभास्थळी पोहोचत असतात. दुर्दैवाने कोकणात राज ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या मनसैनिकांच्या गाडीला अपघात (Accident) झाल्याची घटना घडली. राज ठाकरे यांची रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर मतदारसंघात आज सभा होती. या सभेला आवर्जून उपस्थित राहण्यासाठी आलेल्या मनसैनिकांच्या (MNS) गाडीला अपघात झाल्याची घटना. राज यांची सभा आटोपून घरी परत जाणाऱ्या मनसैनिकांच्या गाडीला चिपळूण गुहागर मार्गावरील घोणससरे येथे अपघात झाला. इको कार आणि बोलेरे या दोन गाड्यांची समोरासमोर धडक बसली. या अपघातात इको व्हॅनमधील तिघेजण जखमी झाले असून त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आलं आहे.
चिपळूण गुहागर मार्गावरील घोणससरे येथे समोरून अंडी घेऊन येणाऱ्या बोलेरोवर इको कार धडकल्याने दोन्ही गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे, तसेच अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत. गुहागरमधून खेडकडे जात असताना ही अपघाताची घटना घडली.
सभेत काय म्हणाले राज ठाकरे
आज मी सभेनिमित्त कोकणात आलोय, पण खरं सांगतो कोकणात कधीही आलो की कोकण भुरळच घालतो. मी जेंव्हा परदेशात गेलो आणि तिकडचा निसर्ग पाहिला की असं वाटतं कोकणात पण इतका सुंदर निसर्ग आहे पण आपल्याकडे छान सुविधा का नाहीत ? तुम्ही खरं तर भाग्यवान आहात की इतका सुंदर निसर्ग तुम्हाला मिळाला. फक्त एकाच बाबतीत तुम्ही दुर्दैवी आहात ते म्हणजे तीच तीच लोकं तुम्ही निवडून देताय, असे म्हणत सत्ताधारी व विरोधकांवर राज यांनी हल्लाबोल केला.
हेही वाचा
Video: पंतप्रधान म्हणाले, उमेदवार पुढे या, फडणवीस बसूनच होते; मोदींनी नाव घेताच धावत-पळत पुढे आले