मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीबाबत अडलेल्या चर्चा पुन्हा सुरु झाल्या आहेत. विधानसभेसाठी शिवसेनेने फिफ्टी-फिफ्टी जागावाटपाची मागणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेनेने प्रत्येकी 144 जागांचा फॉर्म्युला भाजपला दिला आहे. भाजप मात्र 126 जागा देण्यावर ठाम आहे. त्यामुळे युतीच्या चर्चेचं घोडं पुन्हा अडण्याची शक्यता आहे.
शिवसेना-भाजपमध्ये युतीबाबत यापूर्वी चार ते पाच बैठका झाल्या आहेत. भाजपतर्फे केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, तर शिवसेनेतर्फे उद्योगमंत्री सुभाष देसाई काही बैठकांना उपस्थित होते. तर काही बैठकांना युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे आणि महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकांसाठी पूर्वीचा फॉर्म्युला ठेवावा, असं शिवसेनेचं म्हणणं आहे. तर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत हरलेली पालघरची जागा शिवसेना मागत आहे. याशिवाय आणखी एक-दोन बदलही शिवसेनेला अपेक्षित आहेत.
शिवसेना-भाजप युतीची घोषणा कधीही होऊ शकते, असं वक्तव्य चंद्रकांतदादा पाटलांनी केलं. मात्र शिवसेना मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही, अशी तिखट प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली होती.
संबंधित बातम्या
शिवसेना मुंडावळ्या बांधून प्रपोजलची वाट बघत बसलेली नाही : राऊत
शिवसेना-भाजप युतीचं घोडं कुठे अडलं आहे?
ज्यांना भीती वाटते त्यांनी निवडणूक लढवू नका : उद्धव ठाकरे
युती न झाल्यास लढणार नाही, शिवसेनेचे पाच खासदार अस्वस्थ