मुंबई : 'एबीपी न्यूज नेटवर्क'ची नवीन वृत्तवाहिनी 'एबीपी गंगा'चं लाँचिंग करण्यात आलं आहे. 'एबीपी गंगा'चं प्रक्षेपण आज दुपारी 12 वाजल्यापासून सुरु झालं. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील बातम्यांचा चोवीस तास आढावा या हिंदी भाषेतील चॅनलवर तुम्हाला घेता येणार आहे.
वृत्तवाहिन्यांच्या विश्वात 'एबीपी' ब्रँडचा दबदबा आहे. त्यातच उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधील बातम्यांवर भर देणारी नवीन वृत्तवाहिनी प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. लोकसभा निवडणुकांच्या निमित्ताने राजकीय विश्वातील विविध अपडेट्स 'एबीपी गंगा'वर पाहता येणार आहेत.
'एबीपी गंगा'वर हिंदी भाषेत 24*7 तुम्हाला ताज्या घडामोडी पाहता येणार आहेत. सोबतच 'एबीपी गंगा'च्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला ताज्या बातम्या पाहता येतील.