मुंबई : कागदी पिशवीसाठी ग्राहकाकडे तीन रुपयांची मागणी करणं चप्पल निर्मिती करणारी कंपनी 'बाटा इंडिया लिमिटेड'ला महागात पडलं आहे. चंदिगढमधील ग्राहक न्यायालयाने सेवेत कुचराई केल्याचा ठपका ठेवत संबंधित ग्राहकाला नऊ हजार रुपये देण्याचे आदेश 'बाटा'ला दिले आहेत.
चंदिगढचे रहिवासी दिनेश प्रसाद रतुरी यांनी ग्राहक मंचाकडे तक्रार नोंदवली होती. 'चंदिगढच्या सेक्टर 22डी मधील बाटाच्या दुकानातून मी 5 फेब्रुवारीला शूज खरेदी केले होते. कागदी पिशवीसह मला 402 रुपयांचं बिल आकारण्यात आलं.' असं रतुरी यांनी तक्रारीत म्हटलं होतं.
'कागदी पिशवीसाठी पैसे आकारुन त्यावर बाटाने स्वतःच्या ब्रँडची जाहिरातही केली' असंही रतुरी यांनी नमूद केलं होतं. तीन रुपयांच्या रिफंडसह सेवेत कुचराई केल्याप्रकरणी नुकसानभरपाईची मागणीही त्यांनी केली होती. 'बाटा'ने मात्र सेवेत कमतरता असल्याचे आरोप धुडकावून लावले.
'ग्राहकांनी तुमच्या दुकानातील उत्पादन खरेदी केल्यास त्याला मोफत पिशवी देणं, हे तुमचं काम आहे' असं सांगत ही सेवेत कुचराई असल्याचं ग्राहक मंचाने स्पष्ट केलं. त्याचप्रमाणे ग्राहकांना मोफत कागदी पिशव्या देण्याचे आदेशही ग्राहक मंचाने दिले आहेत. पर्यावरणाची इतकीच काळजी असेल, तर मोफत पर्यावरणपूरक पिशव्या पुरवण्याचा सल्लाही मंचाने 'बाटा'ला दिला.
कागदी पिशवीसाठी ग्राहकाकडे 3 रुपये मागणं महागात, 'बाटा'ला ग्राहक मंचाचा फटका
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Apr 2019 10:50 AM (IST)
चंदिगढच्या सेक्टर 22डी मधील बाटाच्या दुकानातून मी 5 फेब्रुवारीला शूज खरेदी केले होते. कागदी पिशवीसह मला 402 रुपयांचं बिल आकारण्यात आलं, अशी तक्रार एका व्यक्तीने ग्राहक मंचाकडे केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -