छत्तीसगड विधानसभेत 90 जागा असून बहुमताचा आकडा 46 आहे. विधानसभा निवडणुकांचे निकाल मंगळवार 11 डिसेंबरला जाहीर होतील, मात्र एबीपी न्यूज-लोकनीती-सीएसडीएस यांच्या एक्झिट पोलनुसार छत्तीसगडमध्ये भाजप 48 ते 56 जागा मिळवण्याचा अनुमान आहे. काँग्रेसच्या पारड्यात 32 ते 38 जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. म्हणजेच भाजपला सरासरी 52, तर काँग्रेसला सरासरी 35 जागा मिळण्याची शक्यता एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आली आहे. तर 3 जागा इतरांच्या पारड्यात पडण्याची शक्यता आहे. अजित जोगी आणि मायावती यांची आघाडी छत्तीसगडमध्ये विशेष बदल घडवून आणताना दिसून येत नाही.
विधानसभा निवडणूक 2013 आणि एक्झिट पोलची तुलना
2013 सालच्या विधानसभा निवडणुकीत भाजपने 49 आणि काँग्रेसने 39 जागांवर विजय मिळवला होता. बसप आणि इतरांच्या खात्यात प्रत्येकी एक जागा होती. एक्झिट पोलची तुलना 2013 सालच्या निवडणूक निकालांशी केली, तर भाजपला तीन जागांवर फायदाच होण्याची शक्यता आहे, तर काँग्रेसच्या चार जागा कमी होण्याची चिन्हं आहेत.
एक्झिट पोलमधील निरीक्षणं
रमण सिंह सलग चौथ्यांदा मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर विराजमान होण्याची शक्यता
भाजपला 42 टक्के, तर काँग्रेसला 37 टक्के मतं मिळण्याची शक्यता
बसप आणि अजित जोगी यांच्या युतीला 12 टक्के मतं मिळण्याचा अंदाज
जनता सरकारवर नाराज आहे, मात्र अजित जोगी फॅक्टरमुळे काँग्रेसला फायदा नाही
बसप आणि अजित जोगी यांच्या युतीचा काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हं
छत्तीसगडमधील महिला मतदारांचं भाजपला मतदान
मुख्यमंत्रिपदासाठी रमण सिंह फेवरेट, तर काँग्रेसचे भूपेश बघेल दुसऱ्या स्थानी
संबंधित बातम्या:
Assembly Election Exit Polls: भाजपच्या हातून दोन राज्यं निसटण्याचा अंदाज
Madhya Pradesh Exit Poll: भाजपची हार, काँग्रेस सत्ता मिळवण्याचा अंदाज
Rajasthan Exit Poll : वसुंधरा राजेंना धक्का, भाजपचे तीनतेरा