ABP News C Voter Survey : उत्तर प्रदेशच्या निवडणुकीच्या रणधुमाळीत सध्या दोन मोठ्या घटनांचे पडसाद मोठ्या प्रमाणावर उमटताना दिसत आहेत. एक म्हणजे, काशी विश्वनाथ मंदिराच्या (Kashi Vishwanath Dham) कायाकल्पाची आणि दुसरी शेतकरी आंदोलन सुरु असताना झालेल्या लखीमपूर खेरी हिंसाचाराची (Lakhimpur Kheri). अशातच या हालचालींचा निवडणुकीवर किती परिणाम होईल, हे जाणून घेणं महत्त्वाचं ठरणार आहे. हे जाणून घेण्यासाठी एबीपी न्यूजसाठी सी व्होटरनं सर्वे केला आहे. या सर्व्हेमध्ये 1288 लोकांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. 


सर्व्हेमध्ये लोकांना विचारण्यात आलं की, पंतप्रधान मोदींच्या वाराणसी दौऱ्यामुळे भाजपच्या बाजूनं वातावरण निर्माण होईल का? या सर्व प्रश्नाचं 57 टक्के लोकांनी हो असं उत्तर दिलं. तर 43 टक्के लोकांनी नाही असं उत्तर दिलं. लोकांना विचारण्यात आलं की, काशी विश्वनाथ कोरिडोरच्या उद्घाटनामुळे भाजपला (BJP) निवडणुकांमध्ये कितपत फायदा होईल? या प्रश्नाचं 53 टक्के लोकांनी खूप फायदा होईल असं उत्तर दिलं. तर 20 टक्के लोकांनी थोडा फायदा होईल असं उत्तर दिलं. तर 27 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, याचा भाजपला निवडणुकीत अजिबात फायदा होणार नाही. 




पंतप्रधान मोदींच्या वाराणसी दौऱ्यामुळे निवडणुकीत भाजपच्या बाजूने वातावरण निर्माण होईल का?


हो : 57%
नाही : 43%


काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा भाजपला निवडणुकीत कितपत फायदा?


खूप : 53 टक्के 
थोडा : 20 टक्के 
अजिबात नाही : 27 टक्के 


पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या वाराणसी दौऱ्यावर आहेत. त्यांनी सोमवारी काशी विश्वनाथ कॉरिडोरचं उद्घाटन केलं. त्यासोबतच पंतप्रधान मोदींनी वाराणसीमध्ये गंगेत डुबकी घेतली. संध्याकाळी विवेकानंद क्रूझवरुन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर नेत्यांसोबत गंगा आरतीमध्ये सहभागी झाले होते. 


उत्तर प्रदेशात शेतकरी नेत्यांनी निवडणूक लढवली तर यूपीमध्ये कोणाला फायदा होणार?


भाजप : 55%
विरोधी पक्ष : 45%


शेतकरी नेते राजकीय पक्षात गेल्यास फायदा कोणाला होणार?


भाजप : 55%
विरोधी पक्ष : 45%


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह