Gujarat Election 2022 : विधान सभा निवडणुकीवरून गुजरातमध्ये राजकीय वातावरण तापत आहे. भाजप, काँग्रेस आणि आम आदमी पार्टीसह असदुद्दीन ओवेसी यांचा  एआयएमआयएम (AIMIM) देखील यावेळी गुजरातच्या निवडणूक रिंगणात उतरला आहे. ओवेसी यांच्या एंट्रीने आता गुजरातमध्ये चर्चा सुरू झाल्या आहेत की, त्यांना मुस्लिम मते मिळणार का? लोक धर्माच्या आधारावर मतदान करतील का?. आपने इसुदान गढवी यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवले आहे.  गढवी हे ओबीसी समाजातून येतात. अशा परिस्थितीत लोक जातीच्या आधारावर मतदान करणार का? असा प्रश्नही उपस्थित होऊ लागला. यातच आता सी व्होटरच्या सर्व्हेत महत्वाची माहिती समोर आलीय. 


गुजरातमध्ये सर्वच पक्षांकडून निवडणूक प्रचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यात 1 डिसेंबरला आणि दुसऱ्या टप्प्यात 5 डिसेंबरला मतदान होणार आहे. सर्वच पक्षांच्या नेत्यांनी प्रचारात ताकद लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा चेहरा आणि विकासाचा दाव्यावर भाजप या निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. दुसरीकडे, काँग्रेसला राहुल गांधी यांच्या गुजरात दौऱ्याचा फायदा होईल, अशी काँग्रेसला आशा आहे. अशा परिस्थितीत लोक जात, धर्म, विकासाला सर्वाधिक पसंती देणार की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना? यावर सर्व्हेतून लोकांची मते जाणून घेण्यात आली आहेत.  
 
सी-व्होटरने या प्रश्नासंदर्भात एबीपी न्यूजसाठी साप्ताहिक सर्वेक्षण केले आहे. सर्वेक्षणात 14 टक्के लोकांचा विश्वास आहे की ते धर्माच्या आधारावर मतदान करतील. त्याचवेळी 14 टक्के लोक जातीच्या आधारावर मतदान करतील. 26 टक्के लोक पीएम मोदींच्या चेहऱ्याला मतदान करतील. जास्तीत जास्त लोकांनी विकासाला प्राधान्य दिले तर 33 टक्के लोकांनी विकासाच्या आधारे मतदान करणार असल्याचे सांगितले. 


गुजरातमध्ये कोणत्या आधारावर मतदान होणार?
धर्म : 14 टक्के
जात : 14 टक्के
विकास : 33 टक्के 
मोदी : 26 टक्के 
इतर : 13 टक्के  


टीप : सर्वेक्षणातून समोर आलेले निकष पूर्णपणे लोकांकडून मिळालेल्या उत्तरांवर आधारित आहेत, त्यामुळे यातून एबीपी न्यूज अथवा एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. सी-व्होटरने एबीपी न्यूजसाठी हे साप्ताहिक सर्वेक्षण केले आहे. यासाठी गुजरातमध्ये 2,128 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.


महत्वाच्या बातम्या


ABP C Voter Survey: गुजरात निवडणुकीमध्ये 'ओवेसी फॅक्टर' किती मोठा? सर्वेतील आकडे तर जोरदारच