Lok Sabha Election 2024 Opinion Poll: नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Elections 2024) च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनिती आखत आहे. भाजप (BJP) तिसऱ्यांदा सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. तर, काँग्रेससह (Congress) देशातील इतर विरोधी पक्षांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहेत. 


आगामी लोकसभा निवडणूक 2024 च्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. प्रत्येक पक्ष आपापली रणनीती बनवण्यात व्यस्त आहे. अशा परिस्थितीत सी व्होटरनं एबीपी न्यूजसाठी 2024 चा पहिला ओपिनियन पोल घेतला आहे. शनिवारी (23 डिसेंबर) 5 राज्यांचं सर्वेक्षण दिसून आलं आहे. आता रविवारी (24 डिसेंबर) ओपिनियन पोल पार्ट 2 मध्ये देशातील 5 मोठ्या राज्यांचं सर्वेक्षण समोर आलं आहे.         


ओपिनियन पोलच्या माध्यमातून राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या कामावर जनता किती समाधानी आहे, हे जनतेकडून जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. वर्षभरापासून सुरू असलेल्या सी व्होटरच्या या ट्रॅकरमध्ये 2 लाखांहून अधिक लोकांच्या मतांचा समावेश आहे. यामध्ये त्रुटीचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.                 


14 टक्के लोकांना माहितच नाही की, राहुल गांधी काय काम करतात?                           


या सर्वेक्षणात समाविष्ट असलेल्या लोकांपैकी सर्वाधिक 39 टक्के लोकांनी 'असंतुष्ट' असल्याचं सांगितलं. तसेच, केवळ 26 टक्के लोकांनी 'खूप समाधानी' म्हटलं आहे. याशिवाय 'कमी समाधानी' असलेल्या लोकांची संख्या विक्रमी 21 टक्क्यांवर पोहोचली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, यातील 14 टक्के लोकांना याबाबत काहीही माहिती नाही.


निवडणुकीपर्यंत विरोधी आघाडी टिकण्याबाबत 50 टक्के लोकांना शंका 


शनिवारी जाहीर झालेल्या सी व्होटर ओपिनियन पोल सर्वेक्षणाच्या निकालातूनही हे स्पष्ट झालं आहे की, देशातील जनतेचा भारतीय विरोधी आघाडीच्या एकजुटीवर फारसा विश्वास नाही. सर्वेक्षणात सहभागी झालेल्या 50 टक्के लोकांनी निवडणुकीपर्यंतच्या एकजुटीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. ही युती निवडणुकीपर्यंत टिकणार नाही, याची देशातील जनतेला पूर्ण भीती आहे. निवडणुकीपूर्वीच लोकांच्या मनात अशी भीती निर्माण झाल्यानं विरोधी आघाडीसमोर मोठी अडचण निर्माण होऊ शकतं.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


2024 मध्ये पंतप्रधान मोदी ठरणार हिट की, इंडिया आघाडी मारणार बाजी? सर्वेक्षणाचे आकडे काय सांगतात?