Himachal Pradesh Opinion Poll 2022 : देशात निवडणुकांचे वारे वाहत असून दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांकडून सध्या हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh) निवडणूक प्रचाराचा धडाका लावला आहे. आजच प्रचाराच्या तोफा थंडावणार असून आचारसंहिता लागू होणार आहे. अशातच हिमाचल प्रदेशात (Himachal Pradesh Election) एकाच टप्प्यात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. येथील 68 जागांसाठी 12 नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल 8 डिसेंबरला जाहीर केला जाणार आहे. अशातच एबीपी सी-व्होटरनं हिमाचल प्रदेशातील लोकांचा कौल जाणून घेण्यासाठी सर्वेक्षण केलं आहे. हिमाचल प्रदेशातील लोकांशी याबद्दल बोलण्यात आलं, त्यांची मतं जाणून घेण्यात आली आणि त्या आधारे सर्वेक्षण करण्यात आलं. या सर्वेक्षणातून समोर आलेला निष्कर्ष खरंच आश्चर्यचकित करणारा आहे.
सी-व्होटरच्या ओपिनियन पोलमध्ये हिमाचल प्रदेशातील सर्वात मोठी समस्या कोणती? असा प्रश्न विचारण्यात आला होता. ज्यासाठी काही पर्याय जनतेसमोर ठेवण्यात आले होते. या पर्यायांमध्ये बेरोजगारी, महागाई, मूलभूत सुविधा, कोरोनामधील काम, शेतकरी, कायदा आणि सुव्यवस्था, भ्रष्टाचार, राष्ट्रीय समस्या यांसारख्या समस्यांचा समावेश करण्यात आला होता. या मुद्द्यांवर जनतेनं आपली मतं नोंदवली होती. सर्वेक्षणातून समोर आलेल्या निष्कर्षांनुसार हिमाचलमधील जनतेचा कौल कोणाच्या बाजूनं आहे, हे जाणून घेऊया.
हिमाचल प्रदेशातील जनतेचा कौल कोणाला?
निवडणुकीतील सर्वात मोठा मुद्दा कोणता?
स्रोत : सी-वोटर
बेरोजगारी : 49%
महागाई : 6%
मुलभूत सुविधा : 14%
कोरोना काळातील सरकारचं काम : 6%
शेतकऱ्यांचे प्रश्न : 5%
कायदा आणि सुव्यवस्था : 3%
भ्रष्टाचार : 7%
राष्ट्रीय मुद्दे : 3%
इतर : 7%
डिस्क्लेमर : हिमाचलमधील निवडणूक प्रचाराच्या तोफा आज संध्याकाळी थंडावणार आहेत. हिमाचलमधील सर्व 68 जागांवर 12 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. प्रचार अंतिम टप्प्यात असल्यानं सर्वच पक्षांनी आपलं सर्वस्व पणाला लावलं आहे. हिमाचलच्या लोकांचा कौल कोणाला? हे जाणून घेण्यासाठी C VOTER ने ABP न्यूजसाठी अंतिम मत सर्वेक्षण केलं आहे. या सर्वेक्षणात सर्व 68 जागांवर 20 हजार 784 लोकांची मतं घेण्यात आली आहेत. 3 ते 9 नोव्हेंबर या कालावधीत हे सर्वेक्षण करण्यात आलं आहे. सर्वेक्षणातील त्रुटींचं मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :