AMC Election 2026 Result : अमरावती महानगरपालिकेसाठी मतमोजणी सुरु आहे. पहिल्या दीड तासात अमरावती महापालिकेच्या 87 जागांची मतमोजणी सुरु आहे. अमरावतीमध्ये भाजप 12 जागांवर आघाडीवर आहे. तर अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 5 आणि काँग्रेस 04 जागांवर आघाडीवर आहेत. अमरावतीमधून धक्कादायक निकाल हाती आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा मामेभाऊ विवेक कलोती यांचा पराभव झाला आहे.
अमरावतीमधील बिग फाईटमध्ये कोण आघाडीवर?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ विवेक कलोती पिछाडीवर असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे संजय शिरभाते विजयी झाले आहेत. प्रभाग क्रमांक 14 मध्ये काँग्रेसचे चार उमेदवार विजयी झाले आहेत. प्रभाग 19 साईनगर मधून भाजप नेते तुषार भारतीय आघाडीवर आहेत. प्रभाग 14 जवाहर गेट मधून काँग्रेस नेते विलास इंगोले आघाडीवर आहेत. प्रभाग 3 नावसारी मधून भाजपचे तरुण उमेदवार ऋषिकेश देशमुख आघाडीवर आहेत.
अमरावती महापालिका निवडणूक मतमोजणी अपडेट एकूण जागा - 87
भाजप - 12 (आघाडीवर)
शिवसेना - 02 (आघाडीवर)
राष्ट्रवादी - 05 (आघाडीवर)
काँग्रेस - 04 (आघाडीवर)
शिवसेना (उद्धव ठाकरे) -.
राष्ट्रवादी (शरद पवार) -
महाराष्ट्र नवनिर्माण सेना -
इतर (वंचित, सप, एमआयएम, आप, बसपा, युवा स्वाभिमान) - 05
अमरावती महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी 44 जागांची गरज आहे. हा आकडा कोण गाठणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. अमरावती महापालिका निवडणुकीत काही पक्ष स्वतंत्र तर काही पक्ष आघाडी करुन निवडणूक लढले. अमरावतीत राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, एकनाथ शिंदेंची शिवसेना, बसपा, युवा स्वाभिमान पार्टी यांनी स्वतंत्रपणे निवडणूक लढवली. तर, वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फोरम यांनी आघाडी करत निवडणूक लढवली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टी आणि समाजवादी पक्षानं आघाडी करुन काही जागा लढवल्या. तर काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती लढवल्या.
भाजपनं 67 जागा लढवल्या तर 5 अपक्षांना पाठिंबा दिला. दुसरीकडे काँग्रेसनं 62 जागांवर उमेदवार दिले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं 45 जागांवर निवडणूक लढवली. अमरावती महापालिकेत सर्वाधिक जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं लढवल्या. त्यांनी 85 जागांवर उमेदवार दिले होते. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं 67 जागा लढवल्या. अमरावतीत वंचित बहुजन आघाडी आणि युनायटेड फोरम यांनी 46 जागा लढवल्या. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीनं 14 ठिकाणी उमेदवार दिले. तर, आमदार रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पक्षानं 35 तर बहुजन समाज पक्षानं 30, एमआयआएमनं 25 आणि समाजवादी पक्षानं 7 जागांवर उमेदवार दिले होते.
