मुंबई : देशभरातील 600 कलाकारांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असे आवाहन केले होते. त्यानंतर आता 907 कलाकार आणि साहित्यिकांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन केले आहे. या कलाकारांनी देशातील नागरिकांना भारतीय जनता पक्षालाच मत देण्याचे आवाहन केले आहे. आवाहन करताना कलाकारांनी म्हटले आहे की, "आपल्याला मजबूर सरकार नको आहे, आपल्याला एक मजबूत सरकार हवे आहे", असे म्हटले आहे.
गायक-संगीतकार शंकर महादेवन, नाट्यकर्मी वामन केंद्रे, शिल्पकार राम सुतार, पंडित जसराज, अभिनेत्री कोयना मित्रा, अभिनेत्री पल्लवी जोशी, बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय, गायिका अनुराधा पौडवाल, गीतकार अभिजीत भट्टाचार्य, राहुल रॉय, विजयलक्ष्मी कृष्णन, संतूरवादक कमल गोएंका, अभिनेत्री सुश्मिता मुखर्जी आणि संगीतकार सुनिल कौशिक यांच्यासह 907 कलाकारांनी एक परिपत्रक जारी करुन त्याद्वारे भारतीय जनता पक्षाला मत देण्याचे आवाहन केले आहे.
वाचा : भाजप आणि मित्रपक्षांना मतदान करु नका, नसीरुद्दीन शाह, कोंकणा, पालेकरांसह 600 कलाकार एकवटले
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीला उद्यापासून सुरुवात होत आहे. निवडणुकीचा फिव्हर सर्वत्र पाहायला मिळत आहे. आपले कलाकारदेखील यामध्ये मागे नाहीत. अनेक कलाकार विविध राजकीय नेत्यांचा प्रचार करताना दिसत आहेत. त्याचबरोबर आता थेट मोठ्या संख्येने कलाकारांनी एकत्र येत लोकांना नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पक्षाला मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
600 मोदी विरोधक कलाकारांविरोधात 900 मोदीसमर्थक कलाकार एकवटले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Apr 2019 07:41 PM (IST)
देशभरातील 600 कलाकारांनी एकत्र येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या मित्रपक्षांना मतदान करु नका असे आवाहन केले होते. त्यानंतर आता 907 कलाकार आणि साहित्यिकांनी एकत्र येत पंतप्रधान नरेंद्र मोदींचे समर्थन केले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -