UP Election 2022 : विधानसभा निवडणुकांच्या निमित्ताने उत्तर प्रदेशमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आत्तापर्यंत उत्तर प्रदेशमध्ये पाच टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. 3 मार्चला सहाव्या टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठीच्या प्रसाचाराच्या तोफा आज थंडावणार आहेत. सहाव्या टप्प्यात 57 जागांसाठी मतदान होणार आहे. यामध्ये गोरखपूर मतदारसंघाचा समावेश आहे. या मतदारसंघातून विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ निवडणूक लढवत आहेत. गोपखपूर हा भाजपचा अभेद्य गड मानला जातो. यावेळी योगी आदित्यनाथ यांच्याविरोधात या मतदारसंघातून 12 उमेदवार निवडणूक लढवत आहेत.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ 1998 ते 2017 पर्यंत गोरखपूर मतदारसंघातून खासदार राहिले आहेत. 1998 मध्ये त्यांनी पहिल्यांदा भाजपचे उमेदवार म्हणून येथून लोकसभा निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत ते अगदी कमी फरकाने विजयी झाले होते. पण त्यानंतर प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या विजयाचे अंतर वाढत गेले. 1999, 2004, 2009 आणि 2014 मध्ये ते खासदार म्हणून निवडून आले.
मुख्यमंत्री योगी यांच्या विरोधात 12 उमेदवार
गोरखपूर जिल्ह्यातील सर्व 9 विधानसभा जागांसाठी एकूण 109 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. गोरखपूरच्या जागेवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या विरोधात एकूण 12 उमेदवार आहेत. हे 12 उमेदवार बहुतांशी राजकारणातील नवे खेळाडू आहेत. समाजवादी पार्टीने गोरखपूरमधून भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष उपेंद्र शुक्ला यांच्या पत्नी शुभवती शुक्ला यांना उमेदवारी दिली आहे. तर बहुजन समाज पक्षाकडून (बसपा) ख्वाजा शमसुद्दीन आणि काँग्रेसकडून चेतना पांडे रिंगणात आहेत. त्याचवेळी भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर रावण आझाद समाज पक्षाशी (कांशीराम) खेळत आहे
राजकीय तज्ञांच्या मतानुसार, गेल्या 33 वर्षांपासून गोरखपूर मतदारसंघाची समीकरणे ही, गोरखनाथ मंदिराने ठरवली आहेत. या 33 वर्षांत एकूण आठ निवडणुका झाल्या. त्यापैकी भाजप आणि हिंदू महासभा (योगी आदित्यनाथ यांच्या पाठिंब्याने) सात वेळा विजयी झाल्या आहेत. 2002 मध्ये डॉ. राधामोहन दास अग्रवाल अखिल भारतीय हिंदू महासभेच्या बॅनरखाली या जागेवरून विजयी झाले होते. परंतू, विजयी झाल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. तेव्हापासून आजतागायत त्यांनी या जागेवर कब्जा केला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: