LIVE BLOG | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या भेटीला मातोश्रीवर
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला 'मातोश्री'वर गेले होते. दोघांमध्ये मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याची माहिती
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
14 Jun 2019 11:48 PM
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला 'मातोश्री'वर, मंत्रिमंडळ विस्तारासंदर्भात दोघांमध्ये विस्तृत चर्चा झाल्याची माहिती
चंद्रपूर : सिंदेवाही तालुक्यात वाघाचा हल्ल्यात एकाचा मृत्यू, जंगली प्राण्याच्या हल्ल्यात 15 दिवसातील चौथा मृत्यू, वाघाच्या हल्ल्यात वनमजुराचा मृत्यू, जंगलात गस्तीदरम्यान वाघाचा अशोक चौधरी नामक मजुरावर हल्ला, सिंदेवाही तालुक्यातील गुंजेवाही जंगलातील घटना
मुंबई : गोवंडी परिसरात झाड पडून आणखी एकाच मृत्यू, झाड कोसळून दिवसभरातील तिसरा बळी
नांदेड :
किनवट पोलीस स्टेशनमध्ये एसीबीची रेड , 50 हजाराची लाच घेताना कान्स्टेबलला अटक
नांदेड :
किनवट पोलीस स्टेशनमध्ये एसीबीची रेड , 50 हजाराची लाच घेताना कान्स्टेबलला अटक
एसएससी बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे 20 गुण कमी केल्याप्रकरणी छात्र भारती विद्यार्थी संघटना आक्रमक, शिक्षणमंत्र्यांना दाखवले काळे झेंडे
दौंडचे रासप आमदार राहुल कुल यांना दौंड न्यायालयाचं वॉरंट, भीमा सहकारी साखर कारखान्याने स्टेट बँकेकडून घेतलेल्या 20 कोटींच्या कर्जाची परतफेड करताना दिलेला पाच कोटींचा चेक बाऊन्स प्रकरण, समन्स बजावूनही कोर्टात हजर न राहिल्याने वॉरंट
2019 या वर्षासाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर. मराठी भाषेत सुशील कुमार शिंदे या कवीच्या 'शहर आत्महत्या करायचं म्हणतंय' या काव्यसंग्रहास पुरस्कार. तर सलीम मुल्ला यांच्या 'जंगल खजिन्याचा शोध' या कादंबरीस बाल साहित्य पुरस्कार जाहीर.
परभणी : उद्योजक आणि रासप नेते रत्नाकर गुट्टेंच्या अडचणीत वाढ, एफआरपीची रक्कम थकवल्याप्रकरणी गंगाखेड शुगर्सच्या गोदामाला सील, तब्बल 48 कोटी रुपये किमतीचं साखरेचं गोदाम सील, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर तहसीलदारांची कारवाई
गोवा : गोव्यात पेट्रोल 2.77 तर डिझेल 1.65 रुपयांनी महागले, राज्य सरकारकडून पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित करात प्रत्येकी 5 व 3 टक्के वाढ
आपल्याला युतीतच लढायचे आहे, जागावाटप आणि मुख्यमंत्रिपद याबाबत माझे अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणे सुरु आहे, जिल्हाप्रमुखांबरोबर झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मांडली भूमिका
वर्धा : शेतकऱ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत जबाबदार धरून वडणेर येथील बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकविरोधात गुन्हा दाखल
मुंबई : पश्चिम रेल्वेवर रविवार 16 जून रोजी पाच तासांचा जंबो ब्लॉक, चर्चगेट आणि मुंबई सेंट्रल स्थानकादरम्यान सकाळी 10.35 ते दुपारी 3.35 या वेळेत अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर ब्लॉक
परभणी : शेतकऱ्यांच्या नावावर परस्पर कर्ज घेतल्या प्रकरणी गुट्टे कोठडीत, रत्नाकर गुट्टे यांच्या जामीनाचा फैसला 24 जून रोजी, सरकारी वकिलांनी ईडीच्या कारवाईची माहिती घेण्यासाठी मागितला वेळ
ठाणे : नितीन कंपनी परिसरात मोठी दुर्घटना टळली, गंजलेला सिग्नलचा खांब कोसळला,
सुदैवाने कोणतेही वाहन न आल्याने अनर्थ टळला, टीएमटी बसला अडकलेली वायर सिग्नलच्या खांबाला लागून अपघात
दाभोळकर - पानसरे हत्याप्रकरणात समान दुवा सापडल्याचा तपासयंत्रणेचा दावा,
लवकरच एक मोठ ऑपरेशन होण्याचे सीबीआयकडून हायकोर्टात संकेत
,
दाभोळकर हत्याप्रकरणातील हत्यार शोधून काढण्यासाठी पर्यावरण विभागाच्या परवानग्या पूर्ण, लवककच शोधकार्यास सुरूवात
सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी धनंजय मुंडेना तुर्तास सुप्रीम कोर्टाचा दिलासा,
गुन्हा दाखल करण्याच्या उच्च न्यायालयाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती
#BREAKING
#सांगली : तासगाव-विसापूर रस्त्यावर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेवर दरोडा,
अज्ञातांनी दिवसाढवळ्या 25 लाखांची रोकड लुटली
बाळासाहेब थोरात यांची काँग्रेस विधिमंडळ नेतेपदी निवड,
विजय वडेट्टीवार यांची काँग्रेसच्या विधानसभेतील गटनेतेपदी निवड
नाशिक : उंटवाडी परिसरातील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात गोळीबार झाल्याचा पोलिसांना फोन,
गोळीबार करुन लूटमार केल्याची प्राथमिक माहिती
2006 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : चार आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर, धनसिंग, लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया यांची 50 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका
2006 मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण : चार आरोपींना हायकोर्टाकडून जामीन मंजूर, धनसिंग, लोकेश शर्मा, राजेंद्र चौधरी आणि मनोहर नवारिया यांची 50 हजार रुपयांच्या जामिनावर सुटका
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन जाळून खाक झाली आहे. शेजारी असलेल्या कंपन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीमधील केमिकल कारखान्याला मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेत संपूर्ण कंपनी आगीच्या भक्ष्यस्थानी येऊन जाळून खाक झाली आहे. शेजारी असलेल्या कंपन्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई : मालाडमध्ये झाडाची फांदी अंगावर कोसळून एकाचा मृत्यू तर एक जखमी, नारीयलवाला कॉलनीमधील आज सकाळची घटना, जखमी व्यक्तीवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु
मुंबई : मालाडमध्ये झाडाची फांदी अंगावर कोसळून एकाचा मृत्यू तर एक जखमी, नारीयलवाला कॉलनीमधील आज सकाळची घटना, जखमी व्यक्तीवर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरु
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी नीती आयोगाच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत. या दिल्ली वारीत मुख्यमंत्री अमित शाह आणि नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. पक्षश्रेष्ठींनी मंत्रिमंडळ विस्ताराला हिरवा कंदील दाखवला तरच रविवारी राज्याच्या पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विस्तार होईल. रविवारी शपथविधी घेऊन नवनिर्वाचित मंत्री मंत्रिमंडळ बैठकीत सहभागी होतील. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला चहापानाच्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांच्या पत्रकार परिषदेत नवीन मंत्रिमंडळ जाहीर केलं जाईल.
अखेर चार दिवसांनंतर विरोधी पक्षनेते धनंजय मुंडेंवर फसवणुकीचा गुन्हा दाखल,
औरंगाबाद खंडपीठाचा आदेश,
सरकारी जमिनीच्या बेकायदा हस्तांतरप्रकरणी सकाळी 7.30 वाजता बर्दापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
मनसेअध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 51 वा वाढदिवस,
राज ठाकरेंनी त्यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी केक कापून वाढदिवस साजरा केला,
यावेळी राज यांची आई कुंदा, पत्नी शर्मिला, मुलगी उर्वशी, मुलगा अमित, सुन मिताली ठाकरे उपस्थित होते
देहूरोड येथील भाजप नगरसेवक विशाल खांडेलवाल यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार,
रुग्णालयात उपचार सुरु
पार्श्वभूमी
1. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान समोरासमोर, परंतु दोघांमध्ये ना हस्तांदोलन, ना चर्चा, बिश्केकच्या शांघाय सहकार्य संघटनेच्या संमेलनात दुरावा कायम
2. पावसामुळे भारत-न्यूझीलंडचा सामना रद्द, प्रत्येकी एक गुणाची वाटणी, तर रविवारी पाकिस्तानशी दोन हात
3. विधानसभेला आदित्य ठाकरेंसाठी शिवसेनेची जोरदार मोर्चेबांधणी, आदित्य मुख्यमंत्रीपदाचे दावेदार असल्याचा सेना नेत्यांचा दावा
4. भाजप-शिवसेनेतील कलहामुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याची चर्चा, आयारामांमुळे स्वपक्षीय नेते नाराज, मुख्यमंत्र्यांकडून सर्व आलबेल असल्याचा दावा
5. अभिनेत्री तनुश्री दत्ता प्रकरणात नाना पाटेकरांना मोठा दिलासा, आरोपाबाबत पुरावे नसल्याचा चौकशी अहवाल कोर्टात सादर, तनुश्री दत्ताचा तीव्र संताप
6. मद्य, मांसविक्री विरोधात वारकरी संप्रदाय आक्रमक, आषाढी यात्राकाळात 7 दिवस मद्य आणि मांस विक्रीवर बंदी आणण्याची मागणी