अकोला: अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात सहा शेतकऱ्यांनी केले विषप्राशन, सर्व शेतकरी बाळापूर तालुक्यातील होते. राष्ट्रीय महामार्गाच्या विस्तारीकरणात शेतजमीन गेल्यानंतर मोबदला देण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ, गंभीर स्थितीतील शेतकऱ्यांवर जिल्हा रूग्णालयात उपचार सुरु
नाशिक : जिल्ह्यात गेल्या 24 तासात रेकॉर्डब्रेक पाऊस, तब्बल 1900 मिलिमीटर पावसाची नोंद, त्र्यंबकेश्वर आणि ईगतपुरीला पावसाने अक्षरशः झोडपले, त्र्यंबकेश्वर येथे 396 मिलिमीटर तर ईगतपुरीला 368 मिलिमीटर पावसाची नोंद , नाशिक, दिंडोरी, पेठ येथे देखील 150 मिमीहून अधिक पाऊस
नागपूर : गीतांजली टॉकीज चौक बजेरिया वस्ती येथे अज्ञातांकडून सुमारे 20 ते 25 वाहनांची तोडफोड, मध्यरात्रीच्या सुमारास सर्व गाड्यांच्या काचा फोडल्या, महिनाभरातील तिसरी घटना
मुंबई : कालपासून बंद असलेली सीएसएमटी ते कसारा वाहतूक सुरू, कसारावरुन लोकल आणि एक्सप्रेस गाड्या मुंबईकडे येण्यास सुरुवात, सीएसएमटीकडून कसाऱ्यासाठी लोकल सुरु, कल्याण ते कर्जत मार्ग मात्र अजूनही बंदच
पार्श्वभूमी
1. कलम ३५ ए वरुन काश्मीरमध्ये हालचालींना वेग, कलम १४४ लागू तर मेहबुबा मुफ्ती आणि ओमर अब्दुल्ला नजरकैदेत, मंत्रिमंडळाच्या बैठकीकडे देशाचं लक्ष
2. आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई, ठाणे, नवी मुंबईसह राज्यातल्या अनेक जिल्ह्यांतील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
3. पावसाचा जोर ओसरल्यानं मुंबईची लाईफलाईन पूर्वपदावर, तिन्ही रेल्वे मार्ग पूर्ववत, लांबपल्ल्याच्या गाड्या मुंबईत येण्यास सुरुवात
4. गोदावरी, पंचगंगा, बारवी, उल्हास आणि कोयना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा, गोदाकाठच्या परिसरातला वीजपुरवठा खंडीत, कोयनेचं पाणी कराड, पाटण शहरात
5. काँग्रेसचं अध्यक्ष तरूणांच्या हाती सोपवली जाण्याची शक्यता, देवरांकडून सचिन पायलट आणि सिंधिंयांचं नाव पुढे, 10 ऑगस्टला राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक