LIVE BLOG : 11 वी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर

Advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर..

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jul 2019 07:34 PM
मुंबई : बेस्ट कर्मचारी 6 ऑगस्टपासून संपावर जाणार, कामगार संघटनेकडून बेस्ट प्रशासनाला पत्र
Continues below advertisement
एमटीएनएल इमारतीत लागलेली आग विझवण्यात रोबो अपयशी

पार्श्वभूमी

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

1. चांद्रयान-2 च्या प्रेक्षपणाची तयारी पूर्ण, इस्रोच्या मोहिमेचं काऊंटडाऊन सुरु, श्रीहरिकोटाहून आज दुपारी दोन वाजून 43 मिनिटांनी प्रक्षेपण

2. विधानसभेच्या तोंडावर भाजपकडून 288 जागांसाठी तयारी सुरु, तर शिवसेनेकडूनही  स्वबळाची चाचपणी झाल्याची सूत्रांची माहिती

3. केवळ भाजपचाच नाही तर शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच, भाजप कार्यकारिणी बैठकीत देवेंद्र फडणवीसांचा शिवसेनेला टोला, कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश

4. कर्नाटकातील काँग्रेस-जेडीएसच्या सरकारचा आज अंतिम फैसला येण्याची शक्यता, कुमारस्वामींकडून सरकार वाचवण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु

5. मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश भागात वरुणराजाची कृपादृष्टी, औरंगाबाद, नांदेड, बीडसह जळगाव, धुळे, नंदूरबारमध्येही पावसाच्या सरी

6. कधी निवृत्त व्हायचं ते धोनीला ठाऊक आहे; विश्वचषकानंतर पंतला अधिक संधी देण्याचा आमचा प्लॅन, निवड समिती अध्यक्ष प्रसाद यांची स्पष्टोक्ती

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.