LIVE BLOG | नागपूर : आसोलीतील जिल्हा परिषद शाळेवर संध्याकाळी वीज कोसळून आठ विद्यार्थ्यी जखमी

देशभरातील महत्त्वाच्या आणि ताज्या घडामोडींचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 28 Jun 2019 12:01 AM
नागपूर : आसोली येथील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीवर संध्याकाळी वीज कोसळून आठ विद्यार्थ्यी जखमी, पहिली ते चौथीच्या वर्गातील विद्यार्थी जखमी, नयन कडबे, तेजु दूरबुडे हे दोन विद्यार्थी गंभीर जखमी
बिग बॉस सीझन 2 ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या कार्यक्रमातून पराग कान्हेरे यांना बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आले आहे. पराग यांनी नेहा सोबत केलेल्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
बिग बॉस सीझन 2 ला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. या कार्यक्रमातून पराग कान्हेरे यांना बिग बॉसमधून बाहेर काढण्यात आले आहे. पराग यांनी नेहा सोबत केलेल्या गैरवर्तनामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे.
#BREAKING कल्याण, डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापुरात जोरदार पाऊस, अंबरनाथ शहरात दुपारपासून मुसळधार पाऊस, बदलापूर रेल्वे स्थानकात रुळांवर पाणी साचायला सुरुवात
मुंबई : मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात उद्धव ठाकरेंकडून मंत्री चंद्रकांत पाटील यांचे अभिनंदन, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन केले अभिनंदन
भिवंडी शहर व ग्रामीण भागात मागील तीन तासापासून पावसाची संततधार सुरु
मराठा आरक्षणाच्या निर्णयानंतर राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल करणार असल्याची सूत्रांची माहिती, उच्च न्यायालयाच्या 12-13 टक्के आरक्षणाच्या निर्णयाला राज्य सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याच्या तयारीत, तर यावर्षी विविध अभ्यासक्रमांसाठी झालेल्या अॅडमिशनमध्ये 16 टक्के आरक्षण कायम ठेवण्याबाबत उच्च न्यायालयाकडे फेरविचाराची मागणी करणार, याबाबत मुख्यमंत्र्यांची महाधिवक्त्यांशी चर्चा आणि विधी तज्ज्ञांचाही सल्ला घेतला
मुंबईत जुलैअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक
मुंबईकरांना जुलैअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक असल्याचे महापालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेने मुंबईकरांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांतील राखीव साठय़ातून आता पाणीपुरवठा केला जात आहे. सदर पाणी पुरवठय़ाद्वारे मुंबईवासियांना जुलैअखेरपर्यंत सुरळीतपणे पाणीपुरवठा करता येईल, असे पालिका प्रशासनाने नियोजन केले आहे.

#INDvsWI : वेस्ट इंडिजविरुद्ध नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, भारताच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या संघात बदल नाही
#INDvsWI : वेस्ट इंडिजविरुद्ध नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम फलंदाजीचा निर्णय, भारताच्या अफगाणिस्तानविरुद्धच्या संघात बदल नाही
शिर्डीच्या नगराध्यक्षपदी अर्चना कोते यांची निवड तर
मंगेश त्रिभुवन उपनगराध्यक्षपदी. या
दोघांचीही निवड बिनविरोध झाली आहे.
राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत दोघांची निवड झाली.

शिर्डी नगरपंचायतवर विखे पाटील गटाची सत्ता आहे.

मराठी भाषेला अभिजात दर्जा द्या, खासदार नरेंद्र जाधव यांची राज्यसभेत मागणी
जळगाव घरकुल घोटाळ्याचा निकाल पुन्हा लांबणीवर?
जळगाव : संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या जळगाव घरकुल घोटाळा खटल्याचा निकाल पुन्हा एकदा लांबणीवर पडण्याची शक्यता दोन्ही बाजूच्या वकिलांनी व्यक्त केली आहे. 7 जून रोजी या खटल्याचा निकाल लागणार म्हणून कोर्ट परिसरात गर्दी झाली होती. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे निकाल लांबणीवर पडला. 20 दिवसांनी 27 जून (आज) या दिवशी कामकाज होईल, असे सांगण्यात आले होते. याच दिवशी निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. परंतु आजही तांत्रिक कारणास्तव निकाल लांबणीवर पडणार असल्याचे दोन्ही बाजूच्या वकिलांनी सांगितले.
वीजेच्या धक्क्याने मायलेकाचा मृत्यू,
अकोले तालुक्यातील गर्दणी येथील घटना,
शेतात पाणी भरताना वीजेचा धक्का लागून संगिता झोळेकर (42) आणि अविष्कार (16) या मायलेकाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे

पार्श्वभूमी

1. मराठा आरक्षणाचं भवितव्य आज ठरणार, मुंबई उच्च न्यायालयात दुपारी अंतिम फैसला, हायकोर्टाच्या निर्णयाकडे राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष

2. विश्वचषकात टीम इंडिया आज वेस्ट इंडिजशी भिडणार, मँचेस्टरमध्ये दुपारी मुकाबला, उपांत्य फेरीच्या दिशेनं भारतीय संघाची आगेकूच

3. यंदाच्या मान्सूनचं स्वरुप मुसळधार नाही, हवामान तज्ज्ञांची धक्कादायक माहिती, सिंधुदुर्गात हलक्या सरी, मुंबईत मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम

4. भारतातील सोन्याच्या दरात ऐतिहासिक वाढ, इराण आणि अमेरिकेतील तणावाचा परिणाम झाल्याची शक्यता, सोनं तब्बल 34 हजार 700 रुपये प्रतितोळा

5. जळगावच्या घरकुल घोटाळ्याची आज धुळे न्यायालयात सुनावणी, गुलाबराव देवकरांसह सुरेश जैन यांचं भवितव्य टांगणीला

6. ज्ञानोबा आणि तुकोबांची पालखी आज पुणे मुक्कामी, ज्ञानेश्वर महाराजांची पालखी भवानी पेठेत तर तुकोबांची पालखी निवडुंगा मंदिरात मुक्कामी

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.