LIVE BLOG | पालघर नगरपरिषद निवडणूक निकाल लाईव्ह
पालघर नगरपरिषद निवडणुकीत शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्षांमध्ये सामना रंगला. 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 30 जण अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार आहेत.
नागपूर - नागपूर जिल्ह्यातील सावनेर मध्ये मध्यप्रदेशातून आलेल्या एका कार मध्ये जिल्हा निवडणूक यंत्रणेचे पथक आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत 25 लाख रुपये जप्त केले आहे. 500 रुपयांचे बंडल एका पिशवीत लपवून कार मध्ये ठेवले होते.
महायुती 21
(शिवसेना 14, भाजप 7),
महाआघाडी 02 (राष्ट्रवादी काँग्रेस 2), अपक्ष 05.
महाआघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार - उज्वला केदार काळे (राष्ट्रवादी) 1069 मतांनी विजयी,
महायुतीच्या उमेदवार स्वेता मकरंद पाटील यांचा पराभव
पार्श्वभूमी
पालघर : पालघर नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकांचा निकाल आज हाती येणार आहे. 14 प्रभागांमधील 28 जागांसह एका नगराध्यक्षपदासाठी काल मतदान झालं. दिवसभरात अंदाजे 67 टक्के मतदान झाल्याचं जिल्हा माहिती कार्यालयाकडून सांगण्यात आलं.
पालघर जिल्ह्याची निर्मिती झाल्यानंतर पहिल्यांदाच पालघर नगरपरिषदेची निवडणूक असल्याने सर्वच राजकीय पक्ष पूर्ण ताकदीनिशी या निवडणुकीत उतरले आहेत. शिवसेना-भाजप-रिपाइं युती, काँग्रेस-राष्ट्रवादी बहुजन विकास आघाडी आणि अपक्ष असा सामना रंगला. 90 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असून त्यापैकी 30 उमेदवार अपक्ष म्हणून निवडणूक लढवत आहेत. त्यापैकी 22 जण बंडखोर उमेदवार आहेत.
आतापर्यंत पालघर नगरपरिषदेवर शिवसेनेची सत्ता होती, मात्र आताच्या निवडणुकीत राष्ट्रवादीकडून आयात उमेदवाराला नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीची संधी दिल्याने शिवसैनिक नाराज झाले आणि त्यांनी बंडखोर म्हणून अपक्ष उभं राहण्याचा निर्णय घेतला.
काल सकाळी साडेसात वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत झालं. या मतदान प्रक्रियेसाठी 9 झोनल अधिकाऱ्यांसह 372 कर्मचारी 62 मतदान केंद्रांवर कैनात होते. कोणताही अपप्रकार न घडता मतदान प्रक्रिया पार पडली.
मतमोजणीला आज सकाळी दहा वाजता सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी 14 स्वतंत्र प्रभागांसाठी स्वतंत्र 14 टेबल असतील, तर प्रत्यक्ष मतमोजणीसाठी 42 कर्मचाऱ्यांसह एकूण 100 कर्मचारी यावेळी कार्यरत असतील, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली.
शिवसेना-भाजप-रिपाइंसाठी ही निवडणूक मोठ्या प्रतिष्ठेची झाली आहे. कारण निवडणूक प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे, भाजपचे रवींद्र चव्हाण यांनी हजेरी लावली.
पालघरमधील मतदारराजाने आपला कौल कोणाच्या बाजूने दिला, हे काही तासात स्पष्ट होईल.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार
1) उज्ज्वला केदार काळे (महाआघाडी-राष्ट्रवादी)
2) अंजली परेश पाटील (शिवसेना बंडखोर)
3) स्वेता मकरंद पाटील (महायुती-शिवसेना)
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -