LIVE BLOG | World Cup 2019 : भारताचा अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा संक्षिप्त आढावा

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 22 Jun 2019 11:05 PM
विश्वचषक 2019 : भारत विरुद्ध अफगाणिस्तान सामना, भारताचा अफगाणिस्तानवर 11 धावांनी संघर्षपूर्ण विजय, मोहम्मद शमीची हॅटट्रीक
शिर्डी : अहमदनगर जिल्ह्यात काही भागात पावसाला सुरूवात, राहुरी ,राहाता तालुक्यात मुसळधार पाऊस तर श्रीरामपूर येथे रिमझिम
अकोला : पातूर येथे वीज केंद्राजवळ वीज पडून अभिजीत इंगळे या तरुणाचा मृत्यू, एक जण जखमी, मृतक बार्शी टाकळी तालुक्यातील वाघजाळी येथील रहिवाशी
सिंधुदुर्ग : खासदार विनायक राऊत यांच्या वैभववाडीतील आखवणे-भोम दौऱ्यादरम्यान राडा, पाटबंधारे कार्यकारी अभियंता डवरे यांनी पुनर्वसनामध्ये घोळ केल्याच्या रागातून प्रकल्पग्रस्त त्यांच्या अंगावर धावून गेले
अमरावतीत जोरदार पावसाची हजेरी, वारा आणि विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात, शहरातील अनेक भागात वीज पुरवठा खंडीत
मुंबई : विधानसभेच्या उमेदवारीसाठी काँग्रेसकडे अर्ज करण्याची मुदत 6 जुलैपर्यंत
मुंबई : राज्यातील 56 हजार रुग्णांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत, विविध उपचारांसाठी 550 कोटी वितरित
खंडणीप्रकरणी अभिजीत बिचुकलेला न्यायालयीन कोठडी
बारामती : बारामतीत पुन्हा एकदा महिलेवर सत्तूराने हल्ला,
महिलेच्या मानेवर, तोंडावर, हातावर सत्तूराने वार,
महिला गंभीर जखमी,
खाजगी रुग्णालयात उपचार सुरू, लहान मुलांच्या खेळण्या वरून झाला होता वाद,
आरोपी अरबाज कुरेशी पोलिसांच्या ताब्यात
गोवा : वास्को येथील स्वातंत्र्य पथावर दुचाकीवर झाड कोसळून दुचाकी चालक ठार, सकाळी 6 वाजता घडली घटना, सतीश गावकर या 33 वर्षीय युवकाचे नाव
वर्धा : दारूबंदी जिल्ह्यातच पोलीस कर्मचाऱ्यांचा दारू पिउन धिंगाणा, धिंगाणा घालणाऱ्या चार पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई
नाशिक शहरात पाणी कपात लागू करण्याचे महापौर रंजना भानसी यांचे आदेश,
शहरात पाणी पुरवठ्याचे नियोजन करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना
रत्नागिरी : रत्नागिरीत ईडीचे छापे, रत्नागिरीतल्या वँरॉन कंपनीवर छापे, वँरॉन कंपनीचे मालक श्रीकांत पांडुरंग सावईकर अडचणीत
,
बनावट पतपत्र गैरव्यवहार प्रकरणी ईडीची कारवाई
मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटवरून 20 कासव आणि पोपट जप्त
,
वन विभाग आणि वाईल्ड लाईफ क्राईम कंट्रोल ब्युरोची संयुक्तरित्या कारवाई
,
बिलाल मोहम्मद हनिफ शेख नावाच्या आरोपीला केली अटक

शिर्डी : चोरांचा
17 लाख रुपयांसह एटीम मशीन घेऊन पोबारा, संगमनेर येथील पुणे नाशिक महामार्गावरील घटना, महाराष्ट्र बँकेचे एटीम मशीन लांबविले, मध्यरात्रीची दोन वाजताची घटना
हिंगोलीत रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात
नाशिकच्या महापौर आणि मनपा पदाधिकारी करणार गंगापूर धरणाची पाहाणी, धरणांने तळ गाठल्यानं पदाधिकारी करणार पाहाणी, नाशिककारावरचे पाणी टंचाईचे सावट अधिक गडद
माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील राजकारणात सक्रीय,
जिल्हा परिषदेच्या पोट निवडणुकित कॉंग्रेसच्या उमेदवार
परभणीत पुन्हा पावसाला सुरुवात ,

जिल्ह्यात सर्वत्र पावसाची रिपरिप
,
रात्रीच्या जोरदार पावसानंतर सर्वत्र पुन्हा पाऊस सुरू
उस्मानाबाद जिल्हा आणि शहरात रात्रभर मुसळधार पाऊस आणि सध्याही पावसाची रिपरिप सुरू
सोलापूरात पावसाला सुरुवात, अक्कलकोट परिसरात ही पावसाची हजेरी
बीडमध्ये सर्व दूर पावसाची हजेरी
नव्याने मिळालेलं नागरी पुरवठा खातं मंत्री जयकुमार रावल यांनी नाकारलं, संभाजी निलंगेकर पाटलांकडे सोपवणार अन्न व पुरवठा खात्याचा कारभार, कमी वेळात परफॉर्मन्स देणं शक्य नसल्याचं जयकुमार रावल यांच मुख्यमंत्र्यांना स्पष्टीकरण
,
जयकुमार रावल यांच्याकडे सध्या पर्यटन, अन्न आणि औषध पुरवठा खात्याचा भार

पार्श्वभूमी

1. साताऱ्यानंतर नांदेड, यवतमाळ जिल्ह्यांना भूकंपाचे धक्के, किनवटमध्ये घरांना भेगा, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण

2. मंत्रालयातही दुषित पाण्याचा पुरवठा, अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना जुलाब आणि उलट्या, पाण्याचे नमुने तातडीने तपासण्याचे मुख्य सचिवांचे निर्देश

3.  वातावरणातील बदलामुळे राज्यात लहान मुलांमध्ये दमा बळावला, मुंबईत दहा वर्षांत 10 टक्क्यांनी वाढ, तर बालमृत्यूचं प्रमाणही वाढलं

4. आरक्षण गेलं खड्ड्यात, पदवीपर्यंत मोफत शिक्षण द्या, खासदार संभाजीराजेंचं ट्विट, उस्मानाबादेतील मराठा विद्यार्थ्याच्या आत्महत्येनंतर संभाजीराजेंचा संताप

5. बिग बॉस फेम अभिजित बिचुकलेला पोलिसांकडून बेड्या, साताऱ्यातील चेक बाऊन्सप्रकरणी बिग बॉसच्या घरातून अटक, उद्या न्यायालयात हजर करणार

6. विश्वचषकाच्या मैदानात आज टीम इंडियाची गाठ अफगाणिस्तानशी; विजय शंकरचा दुखापतीतून सावरल्याचा दावा, तर धवनच्या जागी रिषभ पंतला संधी मिळण्याची शक्यता

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.