LIVE : अमित शाह यांचा उमेदवारी अर्ज दाखल
2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 30 Mar 2019 02:52 PM

पार्श्वभूमी
गांधीनगर : भाजपचे अध्यक्ष अमित शाह आज गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि एनडीएचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत....More
गांधीनगर : भाजपचे अध्यक्ष अमित शाह आज गुजरातच्या गांधीनगर मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अमित शाह उमेदवारी अर्ज दाखल करताना भाजप आणि एनडीएचे अनेक दिग्गज नेते उपस्थित आहेत. यामध्ये राजनाथ सिंह, नितीन गडकरी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, प्रकाश सिंह बादल, रामविलास पासवान यांचा समावेश आहे.अर्ज दाखल करण्यापूर्वी अमित शाहांनी आपल्या कुटुंबीय आणि कार्यकर्त्यांची भेट घेतली. यानंतर नारणपुरामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. इथे अमित शाह सभेला संबोधित करणार आहेत. त्यानंतर त्यांच्या रोड शोला सुरुवात होईल.गांधीनगर हा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांचा पारंपरिक लोकसभा मतदारसंघ आहे. 1998 पासून ते इथून निवडून आले आहेत. मात्र यंदाच्या निवडणुकीत त्यांच्या जागेवर अमित शाह यांना उमेदवारी देण्यात आली आहे. वयोमानामुळे लालकृष्ण अडवाणी अमित शाहांच्या रोड शोमध्ये सहभागी होणार नाही, असं भाजपच्या एका मंत्र्याने सांगितलं.2014 मध्ये शिवसेना भाजपची 25 वर्षांची युती तुटल्यानंतर तुळजापूरमध्ये झालेल्या सभेत उद्धव ठाकरे यांनी अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अफजल खानाच्या फौजेसोबत केली होती. यानंतर उद्धव ठाकरे आणि शिवसेनेने वारंवार भाजप, अमित शाह आणि नरेंद्र मोदींवर जोरदार शाब्दिक प्रहार केले होते. मात्र आता त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना ते उपस्थित राहणार आहेत.