Lok Sabha Elections 2019 : मतदानादरम्यान पुलवामात तिसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला

Lok Sabha Elections 2019 : पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 14 जागा, राजस्थानमधील 12 जागा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी सात जागांवर, तर बिहारमधील पाच आणि झारखंडमधील चार जागांसाठी मतदान सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या लडाख आणि अनंतनाग जागेसाठी पुलवामा आणि शोपियां जिल्ह्यात मतदान होत आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 06 May 2019 03:05 PM
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी सुरु असलेल्या मतदानादरम्यान दहशतवाद्यांचा पुलवामा जिल्ह्यात काही तासांच्या अंतरात तिसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला केला आहे. अतिरेक्यांनी छतपोरामधील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर निशाणा साधला. त्याआधी तिकनपोरा आणि रोहमूमधील मतदान केद्रांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता. सुदैवाची गोष्ट म्हणजे तिन्ही हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.
जम्मू काश्मीरच्या अनंतनाग लोकसभा मतदारसंघासाठी सुरु असलेल्या मतदानादरम्यान दहशतवाद्यांचा पुलवामा जिल्ह्यात काही तासांच्या अंतरात तिसऱ्यांदा ग्रेनेड हल्ला केला आहे. अतिरेक्यांनी छतपोरामधील सरकारी शाळेतील मतदान केंद्रावर निशाणा साधला. त्याआधी तिकनपोरा आणि रोहमूमधील मतदान केद्रांवर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकला होता. सुदैवाची गोष्ट म्हणजे तिन्ही हल्ल्यात कोणीही जखमी झाल्याचं वृत्त नाही.
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच लखनौमध्ये मतदान
सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच लखनौमध्ये मतदान
झारखंड : महेंद्रसिंह धोनीने रांचीच्या जवाहर विद्या मंदिर मतदान केंद्रात मतदानाचा हक्क बजावला
मध्य प्रदेश : वडिलांवर अंत्यसंस्कार केल्यानंतर मतदान केंद्रावर, छत्तरपूरमधील व्यक्तीने मतदानाचा हक्क बजावला
बिहारच्या गोपालपूरमधील मतदान केंद्रावर गोंधळ, ईव्हीएम फोडणारा रणजीत पासवान नावाचा व्यक्ती पोलिसांच्या ताब्यात
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.76 टक्के मतदान, उत्तर प्रदेश 9.82%, झारखंडमध्ये 13.23%, पश्चिम बंगालमध्ये 11.23%, बिहारमध्ये 11.51%, जम्मू-कश्मीरमध्ये 0.80%, मध्ये प्रदेशमध्ये 11.43%, राजस्थानमध्ये 13.24% मतदान
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात सकाळी 9 वाजेपर्यंत 10.76 टक्के मतदान, उत्तर प्रदेश 9.82%, झारखंडमध्ये 13.23%, पश्चिम बंगालमध्ये 11.23%, बिहारमध्ये 11.51%, जम्मू-कश्मीरमध्ये 0.80%, मध्ये प्रदेशमध्ये 11.43%, राजस्थानमध्ये 13.24% मतदान
अमेठीच्या राणी आणि भाजप आमदार गरिमा सिंह यांनी मतदानाचा हक्क बजावला. गरिमा या अमेठीचे राजे आणि काँग्रेस खा. संजय सिंह यांच्या प्रथम पत्नी आहेत. यूपी विधानसभेत त्यांनी संजय सिंह यांची दुसरी पत्नी अमिता सिंहचा पराभव केला होता. या दोन राण्यांची ही लढाई तेव्हा चांगलीच गाजली होती.


जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये एका मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला, सुदैवाने कोणीही जखमी नाही
जम्मू काश्मीरमधील पुलवामामध्ये एका मतदान केंद्रावर ग्रेनेड हल्ला, सुदैवाने कोणीही जखमी नाही
जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये मतदानासाठी लोकांचा चांगला प्रतिसाद, कडक सुरक्षा व्यवस्थेत मतदानाला सुरुवात

पार्श्वभूमी

Lok Sabha Elections 2019 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सात राज्यामधील 51 जागांवर आज मतदान पार पडत आहे. या टप्प्यात यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यासह 674 उमेदवारांचं भवितव्य मतदान पेटीत बंद होणार आहे.

पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशमधील 14 जागा, राजस्थानमधील 12 जागा, पश्चिम बंगाल आणि मध्य प्रदेशमधील प्रत्येकी सात जागांवर, तर बिहारमधील पाच आणि झारखंडमधील चार जागांसाठी मतदान सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या लडाख आणि अनंतनाग जागेसाठी पुलवामा आणि शोपियां जिल्ह्यात मतदान होत आहे.

सत्ताधीश भाजप आणि मित्रपक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कारण 2014 मधील लोकसभा निवडणुकीत एनडीएला 51 पैकी 40 जागांवर विजय मिळवता आला होता. दोन जागा काँग्रेसने जिंकल्या तर उर्वरित जागांवर इतर विरोधी पक्षांनी विजय मिळवला.

उत्तर प्रदेशातील 14 जागांवर दिग्गजांमध्ये टक्कर होणार आहे, ज्यात केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी, यूपीए अध्यक्षा सोनिया गांधी आणि कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा समावेश आहे.

अमेठी आणि रायबरेलीमध्ये सपा-बसपा गठबंधनने आपले उमेदवार उतरवले नाहीत. त्यांनी या दोन्ही जागा काँग्रेससाठी सोडल्या आहेत. राजनाथ सिंह लखनौमधून पुन्हा मैदानात आहेत तर अमेठीमध्ये स्मृती इराणींनी राहुल गांधींन आव्हान दिलं आहे.

राजस्थानमध्ये 12 लोकसभा जागावर ज्या 134 उमेदवारांचं भवितव्य निश्चित होणार आहे, त्यामध्ये दोन माजी ऑलिम्पिक खेळाडू, एक माजी आयएएस अधिकारी आणि एक माजी आयपीएस अधिकाऱ्याचा समावेश आहे. या टप्प्यानंतर राजस्थानमधील मतदान संपणार आहे. राजस्थानमध्ये  राज्यवर्धन राठोड, कृष्णा पुनिया, अर्जुन राम मेघवाल प्रमुख उमेदवार आहेत.

पश्चिम बंगालच्या सर्व सात जागांवर तृणमूल काँग्रेस, भाजप, काँग्रेस आणि माकपा यांच्यात लढत पाहायला मिळणार आहे. 2014 च्या निवडणुकीत तृणमूल काँग्रेसने सर्व सात जागांवर विजय मिळवला होता.

बिहारच्या पाच मतदारसंघापैकी हाजीपूर हा लोक जनशक्ती पक्षाचा बालेकिल्ला आहे, तर सारण हा राजदचं गड समजला जातो. मुजफ्फरपूर, सीतामढी आणि मधुबनी हे उर्वरित तीन मतदारसंघ आहेत.

झारखंडमध्ये हजारीबाग, कोडरमा, रांची आणि खुंटीमध्ये आज मतदान होत आहे. केंद्रीय मंत्री जयंत सिन्हा हजारीबागमधून पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

मध्य प्रदेशमध्ये टीकमगड, दामोह, खजुराहो, सतना, रीवा, होशंगाबाद आणि बेतुलमध्ये निवडणूक हो आहे. 2014 मध्ये इथे भाजपने विजय मिळवला होता.

लडाखमध्ये चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे. भाजपकडून सेरिंग नामग्याल मैदानात आहेत तर रिगजिन स्पालबार काँग्रेसच्या तिकीटावर रिंगणात उतरले आहेत. तसंच दोन उमेदवार अपक्ष आहेत.

कोणत्या राज्यात किती जागांवर मतदान?
उत्तर प्रदेश - 14
बिहार - 5
मध्य प्रदेश - 7
राजस्थान - 12
झारखंड - 4
पश्चिम बंगाल- 7
जम्मू काश्मीर - 2

कोण किती जागांवर लढत आहेत?
भाजप - 48
काँग्रेस - 46
बसपा - 33
माकप - 11
सपा - 09
तृणमूल काँग्रेस - 07
शिवसेना - 05
भाकप - 03
अपक्ष - 511

2014 मध्ये कोणाला किती जागा?
भाजप - 39
लोक जनशक्ती पक्ष - 1
राष्ट्रीय लोक समता पक्ष - 1
काँग्रेस - 2
तृणमूल काँग्रेस - 7
पीडीपी - 1

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2024.ABP Network Private Limited. All rights reserved.