LIVE BLOG : डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणी पुनाळेकरांना सशर्त जामीन
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
05 Jul 2019 11:47 PM
पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर पुन्हा एकदा दरड कोसळली, अप लाईन म्हणजे पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या मार्गावर ही दरड पडल्याची माहिती, मंकी हिल दरम्यान सव्वा नऊ वाजता ही घटना, कोणतीही रेल्वे अडकलेली नाही https://
पाकिस्तानचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात, बांगलादेशने सात धावा ठोकताच पाक विश्वचषकाबाहेर
पाकिस्तानच्या 50 षटकात 9 बाद 315 धावा, बांगलादेशने सात धावा रचताच पाकचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात येणार
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सट्टा बाजारातील बडा बुकी सोनू जालानची सुटका. वर्षभराच्या कोठडीनंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून अखेर सोनू जालान उर्फ सोनू मालाडला जामीन मंजूर. प्रदीप शर्मा यांच्या नेतृत्त्वाखाली ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकानं केली होती अटक

शहरी नक्षलवाद आणि भिमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणी गौतम नवलखा यांना दिलेला दिलासा २३ जुलैपर्यंत कायम. गुन्हा रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी पुन्हा एकदा तहकूब. पुढील सुनावणीपर्यंत पुणे पोलिसांनी कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे हायकोर्टाकडून निर्देश

सिंधुदुर्ग : अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणी काँग्रेस आमदार नितेश राणे यांच्यासह 18 जणांना 9 जुलैपर्यंत पोलिस कोठडी
पुणे : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणी सीबीआयच्या अटकेत असलेले वकील संजीव पुनाळेकर यांना सशर्त जामीन मंजूर
मराठा आरक्षणाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात याचिका. मुंबई उच्च न्यायालयानं #SEBC कोट्यासंदर्भात दिलेल्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी करत अॅड. संजीत शुक्ला यांची सर्वोच्च न्यायालयात धाव. मराठा समाजाला मागास ठरवण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयावर याचिकेत आक्षेप

रत्नागिरी : बस शेतात कोसळून अपघात, पाच विद्यार्थी जखमी, जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले
रत्नागिरी : बस शेतात कोसळून अपघात, पाच विद्यार्थी जखमी, जखमींना जिल्हा रुग्णालयात हलवले
मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वेवर दोन्ही रस्त्यांच्या मध्यभागी असणारे माहिती-दिशादर्शक फलक बसवण्याचे काम हाती घेतले जाणार आहे. त्यामुळे 9 जुलै रोजी मुंबईहून पुण्याकडे जाणारी वाहतूक दोन तास बंद राहणार आहे.
पार्श्वभूमी
राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर
1. मोदी सरकार- 2 चा आज पहिला अर्थसंकल्प, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याकडून शेतकरी, नोकरदार वर्गाला मोठ्या अपेक्षा
2. खेकड्यांमुळे तिवरे धरण फुटलं, अधिकाऱ्यांचा हवाला देत जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांचं अजब तर्कट, आतापर्यंत 20 मृतदेह हाती
3. अधिकाऱ्यावर चिखलफेक प्रकरणात नितेश राणेंना अटक, 40 कार्यकर्त्यांवर गुन्हा, मुलाच्या प्रतापामुळं नारायण राणेंवर माफीनाम्याची वेळ
4. विविध बँकांच्या परीक्षा आता मराठी भाषेत, केंद्र सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय, इतर 13 प्रादेशिक भाषांनाही दिलासा
5. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी राज ठाकरेंच्या भेटीला, विधानसभेच्या तोंडावर दोन्ही नेत्यांमध्ये भेट, राजकीय चर्चांना उधाण
6. विश्वचषकात वेस्ट इंडिजची अफगाणिस्तानवर 23 धावांनी मात, विंडीजची विजयी सांगता तर अफगाणिस्तानचा सलग नववा पराभव