LIVE BLOG : सुषमा स्वराज यांचे पार्थिव अनंतात विलीन

Advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 07 Aug 2019 10:33 PM
कोल्हापुरातील धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढला, राधानगरी धरणातील सात क्रमांकाचा दरवाजा उघडला, धरणातून 14,540 प्रतिसेकंद पाण्याचा विसर्ग
Continues below advertisement
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या पूरग्रस्त कोल्हापूर आणि सांगली भागाचा उद्या दौरा करणार, सूत्रांची माहिती, महसुल मंत्री चंद्रकांत पाटील आणि जलसंपदा मंत्री गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांसोबत पूरपरिस्थितीचा आढावा घेणार


पार्श्वभूमी

१. देशाच्या राजकीय इतिहासातील अजातशत्रू व्यक्तिमत्व हरपलं, हृदयविकाराच्या झटक्यानं सुषमा स्वराज यांचं निधन, वयाच्या 67व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

२. सुषमा स्वराज यांचं पार्थिवावर आज दुपारी 3 वाजता अंत्यसंस्कार, सकाळी 11 पर्यंत निवासस्थानी तर 12 ते 3 पर्यंत भाजप कार्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार

३. देशाच्या राजकारणातील झळाळता अध्याय संपला, स्वराज यांच्या निधनावर पंतप्रधान मोदींकडून शोक व्यक्त, तर उत्तम  मार्गदर्शक गमावल्याची अनेक नेत्यांची भावना

४. कलम-370 मुक्त जम्मू-काश्मीरचं भाजपचं स्वप्न साकार, राज्यसभेनंतर लोकसभेतही 370 रद्द करण्याचं विधेयक मंजूर, अमित शाहांकडून विरोधकांचा समाचार

५. शिवसेना खासदार संजय राऊतांचे पोस्टर्स इस्लामाबादेत झळकले, राऊतांच्या बलुचिस्तानबद्दलच्या विधानाचे पाकिस्तानमध्ये पडसाद

६. कोल्हापुरात पावसानं सर्व विक्रम मोडले,बचावकार्यासाठी लष्कर दाखल, सांगली, साताऱ्यासह महाडमध्ये महापूर, पुढील 72 तास मुसळधार पावसाचा इशारा

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.