MPSC State Service Prelims Result 2021 Declared: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (MPSC) एमपीएससी राज्यसेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर केला आहे. ज्या उमेदवारांनी एमपीएससी राज्य सेवा (MPSC State Service Pre Exam 2021) पूर्व परीक्षा दिली आहे ते निकाल तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइटला भेट देऊ शकतात (MPSC राज्य सेवा प्रिलिम्स निकाल 2022). निकाल पाहण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटचा पत्ता आहे - mpsc.gov.in. पूर्व परीक्षेत निवडलेल्या उमेदवारांना आता मुख्य परीक्षा द्यावी लागणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र राज्य सरकारच्या (Maharashtra Government) विविध विभागांमध्ये नियुक्तीसाठी ही परीक्षा (Exam) 23 जानेवारी रोजी घेण्यात आली होती.


या उमेदवारांची झाली निवड 


एमपीएससी पूर्व परीक्षा 2021 मध्ये एकूण 6567 उमेदवारांची निवड झाली आहे. आता हे उमेदवार MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा देतील. महाराष्ट्र राज्य सेवा मुख्य परीक्षा 7, 8 आणि 9 मे 2022 रोजी घेण्यात येणार आहे. एकूण 290 पदांच्या निवडीसाठी ही परीक्षा आयोजित केली जात आहे.


असा पाहता येईल निकाल: 



  • निकाल पाहण्यासाठी सर्वात आधी mpsc.gov.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.

  • येथे आधी 'उमेदवार माहिती – निकाल' विभागात जा. त्यानंतर 'Results of Examinations/Recruitment’ वर जा.

  • यानंतर State Services Preliminary Examination 2021 या लिंकवर क्लिक करा.

  • हे केल्यानंतर, एमपीएससी राज्यसेवा निकालाची गुणवत्ता यादी तुमच्या संगणकाच्या स्क्रीनवर प्रदर्शित होईल.

  • ती डाउनलोड करा. तुमचा रोल नंबर शोधण्यासाठी Control + F दाबा.

  • तुम्हाला हवे असल्यास तुम्ही त्याची प्रिंट काढून ठेवू शकता.


इतर महत्वाच्या बातम्या: 


Kolhapur : विनाअनुदानित शाळांमधील शिक्षकांनी तपासणीसाठी आलेले दहावीचे पेपर परत पाठवले


NEET-UG Exam 2022 : 'नीट' परीक्षा 17 जुलैला तर 2 रजिस्ट्रेशन एप्रिलपासून सुरू


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI