मुंबई : दहावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअरविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं (Maha SCERT) वेबिनारचं आयोजन केलं आहे. हे वेबिनार महाराष्ट्र सरकारच्या SCERT YouTube Channel वरुन प्रसारित केलं जाणार आहे. या वेबिनार सिरीजमध्ये घेण्यात येणाऱ्या विषयांची यादी परिषदेनं जाहीर केली आहे. ज्यात इच्छुक विद्यार्थी भाग घेऊ शकतात आणि तज्ञांकडून मार्गदर्शनही घेऊ शकतात. 16 जूनपासून या वेबिनारला सुरुवात झाली आहे. 


इयत्ता दहावी आणि इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शनासाठी महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे (Maha SCERT) यांच्यामार्फत एका खास वेबिनारचे आयोजन करण्यात आलं आहे. यासंदर्भातील संपूर्ण वेळापत्रकही जारी करण्यात आलं आहे. या वेबिनारचं प्रसारण महाराष्ट्र सरकारच्या SCERT YouTube Channel वर केलं जाणार आहे. विद्यार्थी आणि पालक या वेबिनारमध्ये सहभागी होऊन तज्ञांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. 


महाराष्ट्र राज्य संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे यांनी जाहीर केलेल्या वेळापत्रकात नमूद केलेल्या वेळापत्रकानुसार, करिअर मार्गदर्शनासंदर्भात सेशन जॉईन करण्यासाठी संबंधित माहिती विद्यार्थ्यांनी संकेतस्थळावरुन मिळेल, असं आवाहनही संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद पुणे SCERT यांनी केलं आहे. तसेच सदर वेळापत्रक आपल्या संपर्कातील सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांसोबत शेअर करण्यासही सांगितलं आहे. 



दरम्यान, यासंदर्भात राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनीही ट्वीट करुन माहिती दिली आहे. तसेच त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये या वेबिनारचं संपूर्ण वेळापत्रकही शेअर केलं आहे. वर्षा गायकवाड ट्वीटमध्ये विद्यार्थ्यांना आवाहन करताना म्हणाल्या की, "इ. 10वी व इ. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी करिअर मार्गदर्शनपर विविध विषयांवरील विशेष वेबिनार आजपासून सुरू होत आहेत. @scertmaha मार्फत सुरु करण्यात आलेल्या या वेबिनारमध्ये विद्यार्थ्यांनी अधिकाधिक संख्येने सहभाग व्हा."


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Indian Railway Recruitment 2021: भारतीय रेल्वेमध्ये 'या' पदावर नोकरीची संधी


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI