UPSC Civil Services Prelims Exam 2022 :  केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत आयोजित करण्यात येणारी UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा 2022 ची नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. ज्या तरुणांना आयएएस, आयपीएस, आयआरएस, आयएफएस व्हायचे आहे ते आजपासूनच www.upsc.gov.in किंवा www.upsconline.nic.in या संकेतस्थळावरून ऑनलाईन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 फेब्रुवारी 2022 असणार आहे. 


या परीक्षेद्वारे भारतीय प्रशासकीय सेवा (IAS),भारतीय विदेश सेवा (IFS) आणि भारतीय पोलिस सेवा (IPS) याचबरोबर सर्व भारतीय सेवांसाठी अधिकाऱ्यांची निवड केली जाईल. भारतीय वनसेवा परीक्षेच्या मुख्य परीक्षेत बसण्यासाठी, UPSC सिव्हिल सर्व्हिसेस पूर्व परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. म्हणजेच, दोन्ही स्पर्धा परीक्षांच्या पूर्वपरीक्षा सामायिक असतील. नागरी सेवा पूर्व परीक्षा 5 जून 2022 रोजी होणार आहे.


पात्रता : 
मान्यता प्राप्त विद्यापीठ/संस्थेमधून कोणत्याही शाखेतील बॅचलर पदवी. 
बॅचलर पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम परीक्षेत बसलेले विद्यार्थी अर्ज भरू शकतात. मात्र, उमेदवारांना बॅचलर डिग्री मिळवल्याचा पुरावा द्यावा लागेल.


वयोमर्यादा :
किमान वय - 21 वर्ष. कमाल वय 32 वर्षांपेक्षा कमी असावे. 
उच्च वयोमर्यादा ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांसाठी तीन वर्ष, SC/ST साठी पाच वर्ष आणि शारीरिकदृष्ट्या अपंग प्रवर्गातील उमेदवारांसाठी दहा वर्ष शिथिल आहे.  


महत्वाच्या तारखा :
UPSC नागरी सेवा परीक्षा 2022 (पूर्व परीक्षा) अधिसूचना प्रकाशन तारीख - 2 फेब्रुवारी, 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख - 22 फेब्रुवारी 2022


पूर्व परीक्षेची तारीख - 5 जून, 2022


मुख्य परीक्षेची तारीख - 16 सप्टेंबर 2022


महत्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI