University Examination : राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा  या ऑनलाइनऐवजी ऑफलाइन होण्याची दाट शक्यता आहे. सोमवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेतली. या बैठकीत विद्यापीठांशी चर्चा केल्यानंतर ऑफलाइन परीक्षेबाबत निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ऑफलाइन परीक्षा जूनपर्यंत संपवण्याची सूचनाही सामंत यांनी केली असल्याचे म्हटले जात आहे. 


राज्यात कोरोनाची लाट ओसरली असल्याचे चित्र आहे. कोरोनाचे निर्बंधदेखील शिथील झाले आहेत. मागील जवळपास दीड महिन्यात बाधितांची संख्या घटली आहे. राज्यातील शाळा, महाविद्यालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आले आहे. महाविद्यालये ऑफलाइन सुरू असताना दुसरीकडे विद्यापीठांकडून ऑनलाइन परीक्षा घेतली जात आहे. याबाबतही बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. 


राज्यातील विद्यापीठांनी मे महिन्यात परीक्षा घेण्याची घोषणा केली आहे. ही ऑनलाइन असल्याचेही स्पष्ट करण्यात आले होते. आता परीक्षा पुन्हा ऑफलाइन घेण्यावर चर्चा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे. 


आजपासून दहावी आणि बारावीच्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा


केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) बोर्डाच्या परीक्षा आजपासून म्हणजेच, 26 एप्रिलपासून सुरू होत आहेत. पहिल्या दिवशी 10वी आणि 12वीची परीक्षा फक्त Vocational Subject घेऊन सुरू होईल. या परीक्षांसाठी देशभरात एकूण 7412 परीक्षा केंद्रं असतील, तर परदेशात 133 केंद्रं असतील. 10वी आणि 12वी या दोन्ही वर्गांसह सुमारे 34 लाख मुलं परीक्षेला बसतील. CBSE बोर्डाची दहावीची परीक्षा 24 मेपर्यंत तर 12वीची परीक्षा 15 जूनपर्यंत पर्यंत असणार आहे.  दरम्यान, सीबीएसई बोर्डानं या परीक्षेसाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. 


दहावीचे विद्यार्थी परीक्षेच्या पहिल्या दिवशी चित्रकला आणि काही भाषेच्या पेपरसाठी उपस्थित राहतील. पहिला मुख्य पेपर 27 एप्रिल रोजी इंग्रजी भाषा आणि साहित्य आहे. तर इयत्ता 12वीचे विद्यार्थी पहिल्या दिवशी Entrepreneurship & Beauty & Wellness पेपर देतील. 12वीच्या विद्यार्थ्यांचा पहिला मुख्य पेपर 2 मे रोजी हिंदीचा असेल.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI