UGC NET Registration 2024 : UGC NET परीक्षेचा अभ्यास करणाऱ्यांसाठी मंगळवार दि. 10 डिसेंबरनोंदणीचा शेवटचा दिवस आहे.  परीक्षेसाठी नोंदणी प्रक्रिया नॅशनल टेस्टिंग एजन्सीद्वारे (NTA) सुरू करण्यात आली आहे. सदर परीक्षा 01 ते 19 जानेवारी 2025 पर्यंत घेण्यात येणार आहे. 


जर तुम्ही UGC NET परीक्षेचा अभ्यास करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्ही ही परीक्षा देत असाल तर त्वरीत नोंदणी करा. नोंदणीचा शेवटचा दिवस उद्या (दि. 10 डिसेंबर) रात्री 11:50 पर्यंत आहे. UGC NET परीक्षा 85 विषयांसाठी घेण्यात येणार आहे. परीक्षा पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. ज्या विद्यार्थांना अर्ज करायचा असेल त्यांना https://ugcnet.nta.ac.in/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन नोंदणी करता येईल.


या '6' सोप्या स्टेप्सने तुम्ही UGC NET परीक्षेची नोंदणी करू शकतात. 


स्टेप 1: ऑनलाईन नोंदणीसाठी https://ugcnet.nta.ac.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या. 
स्टेप 2: होम पेजवर LATEST NEWS असलेल्या  UGC-NET Decemeber-2024: Click Here to Register/Login फॉर्मच्या लिंकवर क्लिक करा.  
स्टेप 3: त्यानंतर रजिस्ट्रेशनच्या लिंकवर क्लिक करा.
स्टेप 4: तपशीलांसह नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा.
स्टेप 5: रजिस्ट्रेशन केल्यानंतर अर्ज भरा आणि फी भरून अर्ज सबमिट करा. 
स्टेप 6: अर्ज सबमिट झाल्यानंतर प्रिंट घ्या.  


अर्ज कोण करू शकतो ?


या परीक्षेसाठी उमेदवारांना मान्यताप्राप्त विद्यापीठातून संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे तसेच प्रथम वर्षाची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थीही अर्ज करण्यास पात्र आहे. सामान्य प्रवर्गाकडे किमान 55 टक्के गुण आणि एससी / एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 50 टक्के गुण निकष आहे. वयोमर्यादा 31 वर्षापेक्षा कमी असावी. 


अर्ज नोंदणीकरीता या गोष्टी लक्षात असू द्या


 उमेदवार UGC - NET डिसेंबर 2024 साठी फक्त “Online” मोडद्वारे अर्ज करता येईल. इतर कोणत्याही पद्धतीने अर्ज फॉर्म स्वीकारला जाणार नाही. उमेदवारांना एकापेक्षा जास्त अर्ज भरण्याची परवानगी नाही. एनटीएवर उपलब्ध माहिती बुलेटिनमध्ये दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी काटेकोरपणे पालन केले पाहिजे. सूचनांचे पालन न करणाऱ्या उमेदवारांना थोडक्यात अपात्र ठरविले जाईल. ऑनलाइनमध्ये ई-मेल आयडी आणि मोबाइल नंरब योग्य आहे की अयोग्य याची उमेदवारांनी खात्री करणे आवश्यक आहे.


इतर बातम्या :


CBSE Exams 2024 : CBSE पेपर पॅटर्नमध्ये मोठा बदल, विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतेनुसार निवडता येणार परीक्षेची पातळी; नेमका बदल काय?


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI