UGC NET 2022 : UGC NET परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू; 20 मे पर्यंत करू शकता अर्ज, जाणून घ्या 

UGC NET 2022 : डिसेंबर 2021 आणि जून 2022 फेज परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज 30 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात आले आहेत.

Continues below advertisement

UGC NET 2022 :  विद्यापीठ अनुदान आयोग राष्ट्रीय पात्रता परीक्षा, UGC NET 2022 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी, NTA कडून एक महत्वाची माहिती देखील जारी करण्यात आली आहे. ज्या अंतर्गत डिसेंबर 2021 आणि जून 2022 फेज परीक्षांसाठी ऑनलाइन अर्ज 30 एप्रिल 2022 पासून सुरू करण्यात आले आहेत. उमेदवार 20 मे 2022 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करू शकतात. सविस्तर जाणून घेण्यासाठी अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.nic.in ला भेट द्या. 

Continues below advertisement

हेल्पलाइन क्रमांकांवर NTA शी संपर्क साधा

NTA ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, जूनच्या परीक्षेच्या नोंदणीपासून ते परीक्षेचे वेळापत्रक आदी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान, UGC NET अर्जामध्ये दुरुस्ती करण्याची संधी देखील असेल. यासाठी 21 मे ते 23 मे 2022 पर्यंत एडिटिंग विंडोची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. अर्ज फक्त ऑनलाइन सबमिट केले जाऊ शकतात. कोणत्याही समस्या असल्यास, उमेदवार हेल्पलाइन क्रमांकांवर NTA शी संपर्क साधू शकतात. 

UGC NET 2022 साठी अर्ज कसा करावा? 

-उमेदवारांनी अधिकृत वेबसाइट - ugcnet.nta.nic.in ला भेट देणे आवश्यक आहे.
-मुख्यपृष्ठावर, "UGC-NET डिसेंबर 2021 आणि जून 2022 साठी ऑनलाइन अर्जाची नोंदणी" असलेल्या लिंकवर क्लिक करा. 
-'नवीन नोंदणी' वर क्लिक करा आणि सर्व तपशील भरा.
-आता तुमची क्रेडेन्शियल्स वापरून लॉगिन करा आणि UGC NET अर्ज भरा.
-नोंदणी शुल्क भरा आणि सबमिट वर क्लिक करा.
-तुमचा UGC NET 2022 फॉर्म सबमिट केला जाईल.
-एक कॉपी डाउनलोड करा आणि भविष्यातील संदर्भांसाठी प्रिंट आउट ठेवा. 
-NTA नोटिसची लिंक तपासा

NTA UGC NET परीक्षेसाठी अर्ज करताना किती अर्ज शुल्क भरावे लागेल? 
परीक्षेसाठी अर्ज करताना उमेदवारांना एक विशिष्ट शुल्क भरावे लागेल. हे वेगवेगळ्या श्रेणीनुसार आहे. सामान्य/अनारक्षित श्रेणीसाठी हे शुल्क रु. 1100 आहे. तर EWS/OBC/NCL साठी 550 रुपये आणि तृतीय लिंगासाठी 275 रुपये आहे. यूजीसीचे अध्यक्ष एम जगदेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ज्युनियर रिसर्च फेलोशिप' आणि 'असिस्टंट प्रोफेसर' सीबीटी जूनच्या दुसऱ्या आठवड्यात आयोजित केली जाईल. 

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola