मुंबई : राज्यातील विविध विद्यापीठांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा सुरु आहेत. मात्र, पूरपरिस्थिती, कोरोना, तांत्रिक अडचणी अनेक विद्यार्थ्यांना अंतिम वर्षांची परीक्षा देता आली नाही. अशा विद्यांर्थ्यांची 10 नोव्हेंबरपूर्वी पुन्हा परीक्षा घेणार असल्याची माहिती उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. सोबत सीईटी परीक्षा देऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा एक संधी दिली जाणार आहे. शुक्रवारी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मंत्री सामंत यांनी पत्रकार परीषदेत दिली.


मुंबई, पुणे, अमरावती, सोलापूर विद्यापीठात विद्यार्थ्यांना अडचणींना समोरे जावं लागलं ही बाब लक्षात आली आहे. काही प्रमाणात आढावा घेताना कळलं की परीक्षा घेताना त्रुटी राहिल्यात. पूरपरिस्थिती, कोव्हीडमुळे आणि तांत्रिक अडचणीमुळे ज्यांना अंतिम वर्षाच्या परीक्षा देता आल्या नाहीत, त्या विद्यार्थ्यांच्या 10 नोव्हेंबर पूर्वी पुन्हा परीक्षा घेण्यात येणार आहेत. त्यांचे निकाल सुद्धा लवकरात लवकर जाहीर होतील, असेही सामंत म्हणाले.


परीक्षांचं काम दिलेल्या कंपन्यांमुळे गोंधळ : मंत्री सामंत


मुंबई विद्यापीठ आयडॉल परीक्षेदरम्यान जो सायबर हल्ला झाला त्याबाबत सायबर सेलकडे तक्रार केली आहे. अमरावती विद्यापीठ दरम्यान जो परिक्षेबाबत गोंधळ झाला. त्यामध्ये परीक्षांचं काम दिलेल्या कंपनीने सहकार्य न केल्याने हा गोंधळ झाला असल्याचे त्यांनी सांगितले. या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे.

भाजप सरकरच्या काळातील विद्यापीठ कायद्यात त्रुटी : सामंत


भाजप सरकरच्या काळात 2016 साली विद्यापीठ कायदा तयार करण्यात आला. त्यामध्ये अनेक कुलगुरूंनी काही त्रुटी सांगितल्या आहेत. त्या त्रुटी दूर करण्यासाठी आम्ही समिती स्थापन केली आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण मिळावे, त्यांची चांगल्या प्रकारे प्रगती व्हावी, अडचणी दूर होतील यासाठी हा अहवाल हिवाळी अधिवेशनाआधी समोर येईल आणि या त्रुटी दूर केल्या जातील.


मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या 20 अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर! लवकरच बाकी विषयांचेही रिझल्ट लागणार


अभियांत्रिकी प्रथम वर्ष प्रवेशबाबत AICTE ने दिलेल्या सूचनेनुसार 1 डिसेंबरपासून नवे शैक्षणिक वर्ष सुरू करायचे आहेत. मात्र, हे राज्यातील विद्यापीठांच्या हातात आहे. जर 1 डिसेंबरपर्यंत प्रवेश प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर आम्ही युजीसीकडे वेळ मागवून घेऊ. फॅक्ट फायन्डिंग कमिटी तयार करून याबाबत चौकशी केली जाणार असून ज्या कंपन्यांमुळे तांत्रिक अडचणीला विद्यार्थ्यना समोरे जावे लागले त्या कंपन्यांना ब्लॅक लिस्टमध्ये टाकलं जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना पूरपरिस्थितीमुळे सीईटी परीक्षा देता आली नाही, त्यांना पुन्हा एकदा संधी दिली जात आहे. त्यासाठी आणखी दोन दिवस रजिस्ट्रेशनसाठी देण्यात आले असल्याचे मंत्री सामंत म्हणाले.


Amravati University | परीक्षेतील घोळानंतर अमरावती विद्यापीठाच्या कारभारावर टीकास्त्र



Education Loan Information:

Calculate Education Loan EMI