मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष 2019-20 च्या अंतिम वर्ष/सत्राच्या नियमित आणि बॅकलॉगच्या 20 परीक्षांचे निकाल जाहिर करण्यात आले आहेत. एकीकडे काही परीक्षा सुरू असताना ज्या परिक्षा पूर्ण झाल्या आहेत, अशा परीक्षांचे निकाल विद्यापीठाकडून लवकरात कसे जाहीर केले जातील यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या ऑनलाइन परीक्षा या 1 ऑक्टोबरपासून तर बॅकलॉगच्या परीक्षा ही 25 सप्टेंबरपासून सुरूवात झाली होती. आता निकाल सुद्धा तितक्यात तत्परतेने लावले जात आहेत. जेणेकरून विद्यार्थ्यांना पुढील अभ्यासक्रमासाठी अडचणी निर्माण होणार नाहीत.
आतापर्यत तृतीय वर्ष बीकॉम सत्र 5 (सीबीसीएस)चा निकाल सुद्धा जाहीर करण्यात आला असून या परीक्षेचा निकाल 94.36 टक्के एवढा लागला आहे. या परीक्षेत एकूण 22 हजार 653 विद्यार्थी यशस्वीरित्या उत्तीर्ण झाले. या परीक्षेला 25 हजार 682 एवढ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 24 हजार 507 एवढे विद्यार्थी प्रविष्ठ झाले होते. यासह बीकॉम अकॉऊन्ट एन्ड फायनान्स सत्र 6 (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम अकॉऊन्ट एन्ड फायनान्स सत्र 5 (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बँकिंग एन्ड इन्श्युरन्स सत्र 6 (सीबीएसजीएस) व नॉन सीबीएसजीएस, बीकॉम बँकिंग एन्ड इन्श्युअरन्स सत्र 5 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (चॉईस बेस्ड), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीए कलिनरी आर्ट सत्र 6 (सीबीसीएस), बीफार्म सत्र 8 (सीबीएसजीएस), बीफार्म सत्र 7 (सीबीएसजीएस), बी-व्होक टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75:25), बी-व्होक रिटेल मॅनेजमेंट सत्र 5 (सीबीएसजीएस 75:25), टीवाय बीकॉम इन्वेस्टमेंट मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम ट्रांसपोर्ट मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), टीवाय बीकॉम फायनान्शिअल मॅनेजमेंट सत्र 5 (चॉईस बेस्ड), बीएस्सी एव्हिएशन सत्र 5 (सीबीसीएस), टीवाय बीकॉम/ बीएमएस एन्व्हार्यमेंटल मॅनेजमेंट अँड इकोनॉमिक्स सत्र 5 (चॉईस बेस्ड), आणि बॅचलर ऑफ सोशल वर्क सत्र 5 (सीबीसीएस), तृतीय वर्ष बॅचलर ऑफ आर्किटेक्चर टर्म 1 आणि टर्म 2 अशा एकूण 20 परीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत.
गडचिरोलीच्या गोंडवाना विद्यापीठाची बाजी, 90 अभ्यासक्रमांचे अंतिम निकाल जाहीर
http://www.mumresults.in/ या संकेतस्थळावर निकाल जााहीर करण्यात आले आहेत. महाविद्यालयांकडून पोर्टलवर गुण अपलोड करण्याची प्रक्रिया सुरू असून, उर्वरित इतर परीक्षांचेही निकाल जलदगतीने लावण्यासाठी विद्यापीठाकडून शर्थीचे प्रयत्न केले जात असल्याचे परीक्षा व मुल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. विनोद पाटील यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाच्या सलंग्नित महाविद्यालये आणि विद्यापीठ विभागातील अंतिम वर्ष/सत्राच्या बॅकलॉग आणि नियमित परीक्षा या वेळेत पूर्ण झाल्या. 25 सप्टेंबरपासून सुरू झालेल्या या ऑनलाईन परीक्षांचे योग्य नियोजन करण्यात आले होते.
Amravati university Exam | अंतिम वर्षाची परीक्षा घेण्यात अमरावती विद्यापीठ चौथ्यांदा नापास!
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI