नवी दिल्लीमुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधरांच्या जागांसाठी निवडणुकीला स्थगिती द्यावी या मागणीसाठी सर्वोच्च न्यायालयात महाराष्ट्र स्टुडंट यूनियननं धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठाच्या अधिसभेवरील पदवीधर निवडणूक दुसऱ्यांदा स्थगित करण्याचा निर्णय राज्य सरकारच्या आदेशानं घेण्यात आला होता. मात्र, आदित्य ठाकरेंच्या नेतृत्त्वातील युवा सेनेनं मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मुंबई विद्यापीठ आणि राज्य सरकारला तडाखा देत ही निवडणूक ठरलेल्या तारखेला घेण्याचे आदेश न्यायालयानं दिले होते.मात्र, प्रशासकीय कारण सांगून विद्यापीठानं 24 तारखेला मतदान घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार उद्या मतदान होणं अपेक्षित आहे. त्यापूर्वीच सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. त्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार असल्यानं मतदान पार पडेल. मात्र, याचिकाकर्त्यांनी निवडणूक प्रक्रिया आणि मतमोजणीला स्थगिती देण्याची मागणी करणार असल्याचं म्हटलं. महाराष्ट्र स्टुडन्ट युनियनचे सिद्धार्थ इंगळे यांच्याकडून याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.


मतदान होणार मतमोजणी रखडणार?


मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीला स्थगिती देण्यासंदर्भात  सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या महाराष्ट्र स्टुडंट युनियनच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. त्यामुळं निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेला कुठलाही अडथळा नाही. मात्र, उद्याच मुंबई विद्यापीठाचे  सिनेट निवडणुकीचे मतदान असल्याने मतदान प्रक्रिया उद्या सकाळपासून सुरू होणार आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून मतदान प्रक्रियेला कुठल्याही प्रकारे  स्थगिती  देण्यात आलेली नाही.


मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार उद्या सकाळी नऊ ते दुपारी पाच  यादरम्यान मतदान प्रक्रिया  पार पडणार आहे. उद्या सर्वोच्च न्यायालयात  महाराष्ट्र स्टुडन्ट युनियनने दाखल केलेल्या स्थगिती संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय नेमके काय निर्देश देते?याकडे सुद्धा लक्ष असणार आहे.  मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणुकीविरोधात याचिका करणाऱ्यांच्या वकील मोहिनी प्रिया यांनी सर्वोच्च न्यायालयात काय युक्तिवाद करणार याबाबत माहिती दिली. निवडणुकीच्या प्रक्रियेला आणि मतमोजणीला स्थगिती द्यावी ही मागणी आम्ही करणार आहोत, असं मोहिनी प्रिया म्हणाल्या.


मुंबई विद्यापीठ सिनेट पदवीधर प्रतिनिधी निवडणूक प्रकरणी उद्या सुप्रीम कोर्टात पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे. विद्यार्थी संघटनांच्या वतीने मोहिनी प्रिया यांनी आज प्रकरण मेन्शन केलं आहे. राज्य सरकार प्रमाणेच विद्यार्थ्यांचीही मागणी  निवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी आहे.  उद्या सकाळी नऊ वाजता जरी निवडणूक प्रक्रिया सुरू होणार असली तरी कोर्टात आमची मागणी स्थगिती देण्याची राहील, असंही मोहिनी प्रिया म्हणाल्या. 


इतर बातम्या :


Mumbai University : मोठी बातमी, मुंबई विद्यापीठाच्या हिवाळी सत्राच्या परीक्षांच्या तारखा जाहीर,परीक्षांना कधीपासून सुरुवात होणार


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI