औरंगाबाद : संपूर्ण महाराष्ट्रात येत्या 5 सप्टेंबर रोजी शिक्षकदिनी उच्च शिक्षित बेरोजगार भक्षक दिन साजरा करणार आहेत. राज्यव्यापी डिग्री जलाओ आंदोलन करून शिक्षण व्यवस्थेचा निषेध करण्यासाठी हे आंदोलन केलं जाणार आहे.
महाराष्ट्रातील पात्रताधारक बेरोजगार युवक-युवती आपल्या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी आणि यापूर्वी शासनदरबारी वारंवार पत्र व्यवहार करूनही कोणत्याही स्वरूपाची सकारात्मक कार्यवाही केली गेली नसल्यामुळे उच्चशिक्षित बेरोजगार तरुणांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे. शासनाच्या नाकर्तेपणाचा निषेध व्यक्त करण्यासाठी प्रतिकात्मक "डिग्री जलाओ आंदोलन" करून "शिक्षक दिन हा भक्षक दिन" म्हणून साजरा करणार आहेत.
या आंदोलनात संपूर्ण महाराष्ट्रातील सर्व विद्याशाखेतील (कला, वाणिज्य, विज्ञान, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, अभियांत्रिकी, व्यवस्थापन शास्त्र, सामाजिक शास्त्र, कायदा शास्त्र) पदविका, पदवी, पदव्युत्तर, डी.टी.एड, बी.एड., बी.पी.एड, एम.एड., एम.पी.एड., एम.फिल.,नेट, सेट आणि पीएचडी पात्रता धारक बेरोजगार यांच्या सर्व संघटना आणि अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित (कनिष्ठ व वरिष्ठ), महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तासिका, कंत्राटी, अतिथी सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम करणाऱ्या, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संघटना, छात्रभारती विद्यार्थी संघटना, महाराष्ट्र स्टुडंट्स युनियन या आणि अश्या जवळ जवळ 30-32 संघटना मिळून हे आंदोलन महाराष्ट्रात शांततेत करणार आहे. तसेच कोव्हिड-19 महामारी संदर्भातील शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या सर्व आदेशांचे पालन करून आंदोलन करणार आहेत.
असं होणार आंदोलन
- पोलीस आयुक्त व अधीक्षक, जिल्हाधिकारी कार्यालय, विद्यापीठ आणि सहसंचालक कार्यालय इत्यादी परिसरात परवानगी मिळालेल्या ठिकाणी (10 ते 50 लोक) सामूहिक डिग्री जलावो आंदोलन करतील.
- ज्या परिसरात परवानगी मिळाली नाही अश्या परिसरात आपआपल्या घरी डिग्री ज्वलन करून त्याचे फोटो / व्हिडीओ तयार करून स्वतःच्या सोशल मीडिया वरून व्हायरल करून या आंदोलनात सहभागी होऊन आपला रोष किंवा निषेध व्यक्त करतील.
- दोन्हीही पद्धतीने डिग्री जलाओ आंदोलन करत असताना कोवीड -19 या महामारी च्या नियंत्रणासाठी वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन नियमांचे पालन करूनच सर्व उच्च शिक्षित बेरोजगार सामील होणार आहेत.
या आहेत मागण्या
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI