SSC Exam Calendar 2021-2022 :  स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) यांनी पुढच्या वर्षी होणाऱ्या  भरती परीक्षांचे वेळापत्रक जाहिर केले आहे.  2022 मध्ये कोणकोणत्या भर्ती परीक्षा कधी होतील याबाबतचे वेळापत्रक SSC ने त्यांच्या ssc.nic.in या अधिकृत वेबसाइट वर जाहिर केले आहे. परीक्षार्थी या वेबसाइटवर जाऊन MTS, CGL, CHSL, दिल्ली पुलिस  MTS, SSC GD  कॉन्स्टेबल,  सेलेक्शन पोस्ट यांसारख्या  भरती परीक्षांची माहिती घेऊ शकतात.  या सर्व भरती परीक्षांच्या तारखा तात्पुरत्या आहेत. यामध्ये बदल देखील होऊ शकतात. SSC च्या  कॅलेंडरनुसार, 2021 वर्षसाठीच्या तीन मोठ्या भरतींच्या नोटिफिकेशन्स  SSC  डिसेंबर 2021 ते मार्च 2022 दरम्यान जाहिर करतील, अशी शक्यता आहे.  कर्मचारी निवड आयोग (SSC) ही एक सरकारी संस्था आहे जी दरवर्षी विविध विभाग आणि भारत सरकारच्या अधीनस्थ कार्यालयांमधील पदांसाठी उमेदवारांची भरती करते.


15 भरती परीक्षांचे कॅलेंडर-


1.SSC च्या  कॅलेंडरनुसार CGL 2021 वर्षासाठी परीक्षेच्या अधिसूचना 23 डिसेंबर 2021 रोजी जाहिर केली जातील. 23 जानेवारीपर्यंत अर्ज घेतले जातील. CGL टियर 1 परीक्षा एप्रिल 2022 मध्ये होणार आहे.
 2. SSC  सीएचएसएल (10+2) परीक्षा  2021 चे नोटिफिकेशन 1 फेब्रुवारी 2022 रोजी जाहिर केले जाईल.  7 मार्च 2022 पर्यंत या परीक्षेचे अर्ज स्विकारले जातील एसएससी सीएचएसएल टियर-1 परीक्षा मे 2022 मध्ये होऊ शकते. 
 3. एसएससी एमटीएस (नॉन टेक्निकल) भरती परीक्षा 2021 चे  नोटिफिकेशन  22 मार्च 2022 रोजी जाहिर केले जाणार आहे.  30 एप्रिल 2022 पर्यंत अर्ज स्विकारण्यात येणार आहेत. जून 2022 मध्ये टियर-1 परीक्षा  होणार आहे.
4- एसएससी सेलेक्शन पोस्ट फेज 10  भरती 2022 परीभेचे नोटिफिकेशन 10 मे 2022 रोजी जाहिर होईल. 9 जून पर्यंत अर्ज स्विकारले जातील जुलै 2022 मध्ये परीक्षा होतील
5- दिल्ली पोलिस हेड  कॉन्स्टेबल मिनिस्ट्रियर भर्ती परीक्षा 2022  चे नोटिफिकेशन 17 मे 2022 रोजी जाहिर होईल. 16 मे पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत. सप्टेंबर 2022 मध्ये ही परीक्षा होईल. 
6- दिल्ली पोलिस  कॉन्स्टेबल (ड्रायव्हर) भर्ती परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन 27 जून 2022 जाहिर होईल. 27 जून 2022 पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.ऑक्टोबर 2022 परीक्षा होईल. 
7- दिल्ली पुलिस हेड   कॉन्स्टेबल (AWO/TPO) पदासाठीच्या परीक्षेचे नोटिफिकेशन  4 जुलै 2022 रोजी जाहिर होणार आहे. नोव्हेंबर 2022 परीक्षा होईल. 
8- दिल्ली पुलिस सीएपीएफ एसआय भर्ती परीक्षा 2021चे नोटिफिकेशन  14 ऑगस्ट 2022 रोजी जाहिर होणार आहे.  13  सप्टेंबर 2022 अर्ज स्विकारले जाणार आहेत.परीक्षा डिसेंबर 2022 मध्ये होईल
9- ज्यूनियर हिंदी ट्रांसलेटर,   ज्यूनियर ट्रान्सलेटर तसेच सीनियर हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा 2021 चे  नोटिफिकेशन 22 ऑगस्ट रोजी जाहिर होणार आहे. डिसेंबर 2022 मध्ये परीक्षा होऊ शकते. 
10. सायंटिफिक असिस्टेंट आयएमडी परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन 29ऑगस्ट 2022 रोजी जाहिर होणार आहे तर परीक्षा जानेवारी 2023मध्ये होईल. 
11. दिल्ली पुलिस एमटीएस भरती   परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन  11 ऑक्टोबर 2022 रोजी जाहिर होणार आहे आणि  परीक्षा फ्रेब्रुवारी 2023 मध्ये होणार आहे.
12. ज्यूनियर इंजीनियर परीक्षा 2021चे नोटिफिकेशन 28  नोव्हेंबर 2022 रोजी जाहिर होणार आहे 27  डिसेंबर 2022 अर्ज स्विकारले जाणार आहेत
13. स्टेनोग्राफर ग्रेड सी डी भरती परीक्षा 2021चे नोटिफिकेशन 5  डिसेंबर 2022 रोजी जाहिर होणार आहे. एप्रिल 2023 मध्ये परीक्षा होणार आहे.
14. दिल्ली पुलिस  कॉन्स्टेबल एग्झिक्यूटिव्ह (महिला , पुरुष)  भरती परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन 9  जानेवरी 2023 रोजी जाहिर होणार आहे. 12  फ्रेब्रुवारी 2023  पर्यंत अर्ज स्विकारले जाणार आहेत.परीक्षा मे  2023मध्ये होईल.
 15-   कॉन्स्टेबल  जीडी सीएपीएफ, एनआईए, एसएसएफ, असम राइफल परीक्षा 2022 चे नोटिफिकेशन 22 फ्रेब्रुवारी 2023  रोजी जाहिर होणार आहे.   31 मार्च 2023 पर्यंत  अर्ज स्विकारले जाणार आहेत. जून 2023 मध्ये परीक्षा होईल.


संबंधित बातम्या


दोन महिन्यांपासून शेअर बाजारात घसरणीचा ट्रेंड; किरकोळ गुंतवणूकदारांच्या कमाईला लागले ग्रहण!


महिला नवउद्योजकांसाठी केंद्राची खास कर्ज योजना; नऊ स्कीमद्वारे सुरु करा स्वत:चा व्यवसाय


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI