SSC MTS tier 1 Result 2020 : कर्मचारी निवड आयोगाने (SSC) एसएससी एमटीएस टीयर 1 चा निकाल जाहीर केला आहे. हा निकाल विद्यार्थांना ऑनलाइन पद्धतीनं पाहता येणार आहे. या परीक्षेत एकूण 44680 परीक्षार्थी पास झाले आहेत. टीयर एक परीक्षेचे परीक्षार्थी हे एसएससीच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच ssc.nic.in वर निकाल पाहू शकतात. एसएससी एमटीएसचा निकाल हा पीडीएफ फाइलमध्ये जाहीर करण्यात आला आहे.
कर्मचारी निवडक आयोगाने पेपर 2 मध्ये उपस्थित राहण्यासाठी पेपर 1 मधील त्यांच्या प्रदर्शनाच्या आधारावर निवडलेल्या उमेदवारांसाठी एसएससी कटऑफ 2021 देखील जाहीर केला.एसएससीने माहिती दिली आहे की, पेपर-1 चा निकाल हा नॉर्मलाइजेशन फॉर्मूलाच्या आधारावर जाहीर करण्यात आला आहे. परीक्षेत पास झालेल्या विद्यार्थ्यांचे गुण हे 4 मार्च 2022 ते 13 एप्रिल 2022 मध्ये जाहीर केले जाणार आहेत. फाइनल एसएससी एमटीएस 2021 आन्सर-की ही 14 मार्च 2022 मध्ये अधिकृत वेबसाइटवर अपलोड केली जाणार आहे.
असा पाहा निकाल (How To Check Result)
1. ssc.nic.in ही वेबसाइट ओपन करा.
2. वेबसाइटच्या होमपेजवर जाऊन Multi Tasking (Non-Technical) Staff Examination 2020 या ऑप्शनवर क्लिक करा.
3..SSC MTS 2020-21 च्या निकालाच्या पीडीएफ फाइलवर क्लिक करा.
4.ही लिंक एका नव्या विंडोमध्ये ओपन होईल
5. त्यानंतर एसएससी एमटीएस रिजल्ट फाइल सेव्ह करा.
महत्त्वाच्या बातम्या:
- Nagpur police : नागपूर पोलिसांची मोठी कारवाई, हवालाची 4 कोटी 20 लाखांची रोकड जप्त
- Russia Ukraine War : रशियाची मोठी घोषणा; युक्रेनमध्ये काही तासांसाठी शस्त्रसंधी लागू, नागरिकांसाठी घेतला निर्णय
- Russia Ukraine War : मोदीजी आम्हाला वाचवा नाहीतर आमचा जीव जाईल, युक्रेनमध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांची आर्त विनवणी
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI