पुणे: आज दहावीचा निकाल जाहीर झाला आहे, बोर्डाकडून दुपारी 1 वाजता ऑनलाईन जाहीर होणार होता, मात्र एकाच वेळी साईटवरती वाढणार ट्रॅफिक यामुळे ११.३० वाजल्यापासून निकाल वेबसाईटवरती जाहीर करण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे. त्यापूर्वी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने पत्रकार परिषद घेत दहावीच्या निकालाचे अपडेट्स दिले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोकण विभागाने बाजी मारली आहे, तर मुलांपेक्षा मुलींच्या निकालाची टक्केवारीही यंदा जास्त चांगली आहे.या वर्षी 92.9 टक्के निकाल (SSC Exam Result 2026) लागला आहे. जेवढ्या मुली परिक्षेला बसल्या होत्या त्यापैकी 94.96 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. मुलांच्याबाबत ती 89.56 टक्के आहे. गेल्यावर्षी प्रमाणे यंदाही मुली अव्वल ठरल्या आहेत. यावेळी मुलींनी बाजी मारली आहे. दोघांमध्ये 5 टक्क्यांचा फरक हा पास होण्यामधला आहे, अशी माहिती बोर्डाचे अध्यक्ष त्रिभुवन कुलकर्णी यांनी दिली आहे. तर बारावीप्रमाणेच आता दहावीच्या निकालाचा टक्का देखील घसरल्याची माहिती त्यांनी दिली आहे. दहावीचा निकाल २ टक्क्यांनी घसरला आहे.(SSC Exam Result 2026) 

Continues below advertisement

SSC Exam Result 2026: मागील वर्षांची आकडेवारी

2026 - 92.09 टक्के2025 - 94.10 टक्के 2024:  95.81 टक्के2023 : 93.83 टक्के

SSC Exam Result 2026:  दहावीचा निकालाचा टक्का का घसरला? 

* कॉपीमुक्त अभियान काटेकोर राबवलं* सीसीटीव्हीमुळे कॉपीमुक्त परीक्षा* बोर्डाचे सर्व अधिकारी, शिक्षकांकडून काटेकोर नियोजन* परीक्षा पूर्व आणि परीक्षा काळातील संवाद* परीक्षांसाठी केंद्राची योग्य निवड* सुविधा असतील अशांच ठिकाणी परीक्षांचे आयोजन

Continues below advertisement

बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी पत्रकार परिषद घेऊन दहावीच्या निकालाबाबतची माहिती दिली. राज्याचा दहावीचा निकाल ९२.०९ टक्के इतका लागला आहे. 12वी प्रमाणेच दहावीचा निकाल देखील २ टक्क्यांनी घसरला आहे. कोकण निकालाचा सर्वात अव्वल लागला आहे, कोकण विभागाचा ९७.६२ टक्के लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल सर्वात कमी लागला आहे. छत्रपती संभाजीनगरचा निकाल ८८.४१ टक्के लागला आहे, अशी माहिती त्रिगुण कुलकर्णी यांनी दिली आहे. 

त्रिगुण कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीनुसार, १० वीचा निकाल विद्यार्थ्यांना सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार आहे, १ वाजता विद्यार्थ्यांना निकाल पाहता येईल असं आधी बोर्डाकडून सांगण्यात आलं होतं, मात्र, अचानक वेबसाईटवरती वाढणारे ट्रॅफिक यामुळे सकाळी ११.३० वाजल्यापासून निकाल पाहता येणार असल्याचा बोर्डाचा महत्वाचा निर्णय बोर्डाकडून घेण्यात आला आहे.

SSC Exam Result 2026:  दहावीच्या निकालात पुन्हा एकदा मुलींची बाजी

मुलींची टक्केवारी ९४.९६ टक्के

मुलांची टक्केवारी: ९०.५६ टक्के

मुलींचा निकाल ९४.९६ टक्के तर मुलांची ९०.५६ टक्केवारी

SSC Exam Result 2026: विभागनिहाय आकडेवारी समोर

कोकण: ९७.६२ टक्के

पुणे: ९४.२४ टक्के

नागपूर: ८९.०७ टक्के

मुंबई: ९४.९७ टक्के

कोल्हापूर: ९५.४७ टक्के

अमरावती: ९०.५० टक्के

नाशिक: ९०.५३ टक्के

लातूर: ८८.४२ टक्के

छत्रपती संभाजीनगर: ८८.४१ टक्के

एकूण विद्यार्थ्यांची नोंदणी: १५ लाख ५५ हजार ०२६ 

उत्तीर्ण विद्यार्थी: १४ लाख २० हजार ४८६

दहावीचा निकाल इथे पाहता येणार? (Where can check SSC 10th result 2026)

https://sscresult.mahahsscboard.in/

https://results.targetpublications.org/

https://results.digilocker.gov.in

https://mahahsscboard.in

https://results.navneet.com 

SSC Result 2026 Online: दहावीचा निकाल कसा पाहाल?

वरीलपैकी कोणत्याही एका संकेतस्थळावर जा. (उदा. mahresult.nic.in). त्यानंतर  'SSC Examination March 2026 Result' या लिंकवर क्लिक करा. त्यामध्ये आवश्यक माहिती भरा. तुमचा दहावीचा सीट नंबर (Seat Number) टाका. आईचे नाव: रकान्यात तुमच्या आईच्या नावाचे पहिले नाव (Mother's First Name) इंग्रजीत टाका. निकाल पाहण्यासाठी 'View Result' बटणावर क्लिक करा.

SSC Result 2026 SMS Link: दहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर कसा पाहाल?

ऑनलाईन संकेतस्थळांशिवाय तुम्हाला दहावीचा निकाल मोबाईल एसएमएसवर ही पाहता येऊ शकतो. त्यासाठी  मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये जाऊन MHSSC  Seat Number टाइप करा आणि तो 57766 या क्रमांकावर पाठवा. DigiLocker: digilocker.gov.in वर 'SSC Result' सेक्शनमधून तुमची गुणपत्रिका डाउनलोड करू शकता. वेबसाईट चालू नसेल तर: sscresult.mkcl.org किंवा  results.targetpublications.org यांसारख्या इतर वेबसाईटचा वापर तुम्ही करु शकता.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI