IPL Rules Update BCCI : आयपीएलच्या 19व्या हंगामात खेळाडू आणि टीम अधिकाऱ्यांकडून नियमांचे वारंवार उल्लंघन होत असल्याने भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) आता कठोर भूमिका घेतली आहे. 7 मे रोजी बीसीसीआयचे सचिव देवजीत सैकिया यांनी या प्रकरणावर मोठं वक्तव्य करत स्पष्ट इशारा दिला की, बोर्ड लवकरच नवे मार्गदर्शक नियम जाहीर करणार असून प्रोटोकॉल मोडणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाणार आहे.

अनधिकृत लोकांचा टीम बस आणि हॉटेलमध्ये वावर

न्यूज एजन्सी ANI शी बोलताना देवजीत सैकिया म्हणाले की, काही टीम मालक आणि अधिकारी अशा ठिकाणी खेळाडूंसोबत फिरताना दिसत आहेत, जिथे त्यांना प्रवेशाची परवानगीच नाही. या प्रकारांना आम्ही अत्यंत गंभीरतेने घेतलं आहे. त्यांनी पुढे सांगितलं की, राजस्थान रॉयल्सच्या टीम मॅनेजरकडून डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरण्याची घटना आणि एका खेळाडूला वेपिंग करताना पकडल्याचा प्रकार आधीच समोर आला आहे. मात्र एवढ्यावरच गोष्ट थांबलेली नाही. काही अनधिकृत लोक खेळाडूं सोबत टीम बसमध्ये प्रवास करत आहेत, टीम हॉटेलमध्ये राहत आहेत आणि परवानगीशिवाय खेळाडू व अधिकाऱ्यांच्या खोल्यांमध्येही जात आहेत. हे सर्व प्रकार बीसीसीआयच्या अँटी-करप्शन प्रोटोकॉलच्या थेट विरोधात असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

गर्लफ्रेंडसोबत फिरणाऱ्या खेळाडूंवरही लक्ष

आयपीएलच्या यंदाच्या हंगामात अनेक भारतीय खेळाडू त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत सार्वजनिक ठिकाणी, विशेषतः विमानतळांवर दिसले होते. यात हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंह आणि ईशान किशन यांची नावं चर्चेत होती. देवजीत सैकिया यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं की, नवी अ‍ॅडव्हायजरी लागू झाल्यानंतर नियम तोडणाऱ्यांवर कठोर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल. यात कोणताही खेळाडू असो किंवा टीम अधिकारी, कुणालाही सूट दिली जाणार नाही.

यापूर्वी राजस्थान रॉयल्सचे टीम मॅनेजर रोमी भिंडर यांच्यावर डगआउटमध्ये मोबाईल फोन वापरल्याप्रकरणी एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला होता आणि त्यांना कडक इशाराही देण्यात आला होता. तसेच राजस्थान रॉयल्सचा कर्णधार रियान पराग याच्या ड्रेसिंग रूममधील वेपिंग प्रकरणालाही बीसीसीआयने अतिशय गंभीरतेने घेतल्याचं समोर आलं आहे.

हे ही वाचा -

Prince Yadav on Virat Kohli : आयपीएलमधील सर्वात मोठा ट्विस्ट! विराटचीच टिप वापरून प्रिन्सने घेतला 'किंग'चा विकेट, सगळेच चक्रावले, नेमकं काय घडलं?