SSC Exam Calendar 2023-24 : कर्मचारी निवड आयोगाकडून एसएससी (SSC) परीक्षा कॅलेंडर 2023-24 जारी करण्यात आलं आहे. यामध्ये 2023-24 वर्षातील SSC MTS, SSC CHSL तसेच इतर परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवार सुधारित एसएससी कॅलेंडर 2023 पीडीएफ आणि परीक्षेचं वेळापत्रकात पाहू शकतात. ssc.nic.in अधिकृत वेबसाईटवर एसएससी कॅलेंडर जारी करण्यात आलं आहे. 29 मार्च 2023 रोजी SSC कॅलेंडर अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलं आहे.

कर्मचारी निवड आयोगाने 29 मार्च 2023 रोजी SSC कॅलेंडर 2023-24 जारी केलं आहे. यामध्ये SSC MTS, SSC CHSL, SSC CGL आणि इतर परीक्षांच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. कर्मचारी निवड आयोगाने (SSC) 29 मार्च 2023 रोजी 2023 मधील SSC परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. उमेदवार दिलेल्या एसएससी कॅलेंडर 2023 मधील परीक्षेच्या तारखा तपासू शकतात.

कर्मचारी निवड आयोगाने जारी केलेल्या वेळापत्रकानुसार मे, जून आणि जुलै 2023 मध्ये SSC MTS, CPO, CHSL, निवड पोस्ट आणि SSC CHSL परीक्षा घेण्यात येणार आहे.

परीक्षा तारीख
SSC MTS पेपर 1 2022-23

02 मे 2023 ते 19 मे2023

13 जून 2023 ते 20 जून 2023

SSC CPO पेपर II 2022-23  02 मे 2023
SSC CHSL टीयर-II 2022-23  26 जून 2023
निवड पोस्ट परीक्षा (Selection Post Examination), फेज-XI, 2023 27 जून 2023 ते 30 जून 2023
SSC CGL टीयप 1 2023  14 जुलै 2023 ते 27 जुलै 2023

SSC परीक्षा कॅलेंडर 2023-24

कर्मचारी निवड आयोग ही एक सरकारी संस्था आहे. या संस्थेमार्फत सरकारी विभाग आणि मंत्रालयांमध्ये भरतीसाठी विविध स्पर्धात्मक परीक्षा आयोजित केल्या जातात आणि त्यानुसार भरती केली जाते. SSC कडून विविध परीक्षा 2023 आयोजित केल्या जातात. यामध्ये SSC CGL (संयुक्त पदवी स्तर), SSC CHSL (संयुक्त उच्च माध्यमिक स्तर) आणि उच्च स्तरीय केंद्र सरकारी संस्थांमध्ये गट B, C आणि D पदांची भरती करण्यासाठी इतर अनेक परीक्षांचा समावेश आहे. SSC परीक्षा कॅलेंडर 2023-24 मध्ये सर्व SSC परीक्षांच्या तात्पुरत्या परीक्षेच्या संभाव्य तारखा जारी करण्यात आल्या आहेत. खालील SSC कॅलेंडरमध्ये  परीक्षेच्या संभाव्य तारखा जाहीर करण्यात आलेल्या तारखा पाहा.

परीक्षा नोटीफिकेशन जारी होण्याची तारीख अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख
SSC CGL 2023 (पदवी स्तर परीक्षा 2023) 1 एप्रिल 2023 1 मे 2023
SSC CHSL 2022 (उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2022) 6 डिसेंबर 2022 4 जानेवारी 2023
SSC CHSL 2023 (उच्च माध्यमिक (10+2) स्तर परीक्षा 2023) 9 मे 2023 8 जून 2023
SSC MTS 2022 मल्टी टास्कींग (नॉन टेक्निकल-Technical) कर्मचारी परीक्षा 2022 17 जानेवारी 2023 17 फेब्रुवारी 2023
SSC MTS 2023 मल्टी टास्कींग (Non-Technical) कर्मचारी परीक्षा 2023 14 जून 2023 14 जुलै 2023
SSC निवड पोस्ट फेज 11 2023 24 फेब्रुवारी 2023 17 मार्च 2023
SSC CPO 2022 8 जुलै 2022 29 जुलै 2022
SSC CPO 2023 20 जुलै 2023 13 ऑगस्ट 2023
कनिष्ठ हिंदी, कनिष्ठ आणि वरिष्ठ हिंदी ट्रान्सलेटर 2023 22 ऑगस्ट 2023 12 सप्टेंबर 2023
SSC JE 2023 26 जुलै 2023 16 ऑगस्ट 2023
SSC स्टेनोग्राफर 2023 2 ऑगस्ट 2023 23 ऑगस्ट 2023




Education Loan Information:

Calculate Education Loan EMI