Banana Cultivation : शेती क्षेत्रात सातत्यानं नवनवीन प्रयोग केले जात आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतकरी भरघोस उत्पादन घेत आहेत. अशाच एका बिहारच्या (Bihar) सीतामढी जिल्ह्यातील मेजरगंजमधील एका युवा शेतकऱ्यानं केळी लागवडीचा (Banana Cultivation) यशस्वी प्रयोग करुन तरुणांसमोर आदर्श ठेवला आहे. अभिषेक आनंद (Abhishek Anand) असं या शेतकऱ्याचं नाव आहे. केळीची लागवडसोबतच त्याने शेतातच एक प्रोसेसिंग युनिट सुरु केलं आहे. चिप्स निर्मितीतून त्याला चांगला नफा मिळत आहेत. पाहुयात त्याची यशोगाथा...
अभिषेक आनंद यांच्या शेतात तयार झालेल्या चिप्सला मोठी मागणी
शेती व्यवसायाचा विस्तार होत असल्यानं खेड्यापाड्यातही रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत. यामुळं शेतकऱ्यांची आर्थिक क्षमता सुधारत आहे. यासोबतच ग्रामीण भागातील लोकांच्या जीवनमानातही सुधारणा दिसून येत आहे. देशातील विविध भागात शेतकरी आता शेतीसोबतच कृषी व्यवसाय मॉडेल स्वीकारत आहेत. बिहारच्या अभिषेक आनंद यांनी आपल्या मेजरगंज गावातील इतर शेतकऱ्यांसोबत केळीची शास्त्रोक्त पद्धतीने लागवड केली आहे. चांगल्या उत्पन्नासाठी त्यांनी शेतातच एक प्रोसेसिंग युनिट उभारले आहे. त्यामाध्यमातून ते केळीपासून चिप्सची निर्मिती करत आहेत. या शेती व्यवसायातून त्यांना चांगलं उत्पन्न मिळत आहे. त्यांनी त्यांच्या उत्पादनांचे चांगले ब्रँडिंग देखील केले आहे. आज अभिषेक आनंद यांच्या शेतात पिकवलेल्या केळीपासून तयार झालेलं चिप्स भारतभर प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या चिप्सला मोठी मागणी आहे.
नेपाळ आणि ढाकामध्ये केळीला मोठी मागणी
अभिषेक आनंद यांच्या शेतातील केळीला देशाबरोबरच परदेशातही मागणी वाढत आहे. त्यांच्या केळीला नेपाळ आणि ढाकामधून देखील मोठी मागणी आहे. अभिषेक आनंद यांना केळी चिप्सच्या प्रोसेसिंग युनिटसाठी बिहार सरकारकडून 25 टक्के अनुदानासह 11 लाख रुपयांचे कर्ज मिळाले आहे. अभिषेक आनंद यांनी स्थानिक पातळीवर 8 ते 10 शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले आहेत. ज्यामध्ये 5 तरुण शेतकरी आहेत. हे सर्वजण मिळून सात एकर जमिनीवर शास्त्रोक्त पद्धतीने केळीची शेती करुन चांगले उत्पन्न घेत आहेत.
केळीची शास्त्रोक्त लागवड केल्यानं उत्पादकता वाढली
अभिषेक आनंद हे स्वतः कृषी पदवीधर आहेत. त्यांना पहिल्यापासूनचं शेतीची आवड होती. अभिषेक आनंद यांनी टिश्यू कल्चर तंत्राने केळीच्या G-9 जातीची लागवड केली होती. त्यानंतर त्यांनी केळीपासून चिप्स बनवण्यासाठी प्रोसेसिंग युनिट देखील सुरु केले. चांगल्या पद्धतीनं केळीचं उत्पादन घेण्यासाठी तसेच विविध योजनांची माहिती घेण्यासाठी अभिषेक यांनी त्यांच्या जिल्ह्यातील सीतामणी येथील उद्यान विभागाच्या कार्यालयाशी देखील संपर्क साधला. याठिकाणी अभिषेक आनंद यांनी सरकारच्या सर्व योजनांची माहिती घेतली.
कोरोना महामारीमध्येच केली केळीची लागवड
पदवीचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर अभिषेक आनंद हे त्यांच्या मेजरगंज गावला गेले. अभिषेक यांच्याकडे पुरेसा वेळ होता. पण शेतीच्या ज्ञानाचा योग्य वापर कुठे करायचा हे त्यांना समजत नव्हते. हा कोरोना महामारीचा काळ होता. या काळात फक्त कृषी क्षेत्रच सर्वाधिक सक्रिय होते. म्हणून मी केळीची शेती करण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाच्या मदतीनं त्यांना आधुनिक केळी लागवडीच्या तंत्राची माहिती मिळाली. प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेसाठी अर्ज केल्यावर ठिबक सिंचनासाठी त्यांना 90 टक्के अनुदानही मिळाले आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
Success Story : परभणीच्या दुष्काळी पट्ट्यात मशरुमचा यशस्वी प्रयोग, उच्चशिक्षित तरुणांनी साधली आर्थिक प्रगती