Short Term Courses : सध्या स्पर्धेचं युग आहे. शिक्षणापासून नोकरीपर्यंत सर्वच ठिकाणी मोठी स्पर्धा पाहायला मिळते. आजच्या स्पर्धेच्या युगात चांगली नोकरी मिळवण्यासाठी सर्वजण धडपडताना दिसतात. बारावी किंवा पदवी उत्तीर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचं लक्ष चांगली नोकरी शोधण्यावर असते. कोणतं शिक्षण घेतल्यावर चांगली नोकरी मिळेल, हा प्रश्न अनेक विद्यार्थ्यांसमोर आहे. विद्यार्थ्यांकडे कोणती कौशल्ये आहेत जी त्यांना नोकरी शोधण्यात मदत करतील, तुम्हीही याच विचारात असाल तर, ही बातमी तुमच्यासाठी आहे.


शॉर्ट टर्म कोर्सेस 


आज आम्ही तुम्हाला यासंदर्भातच माहिती देणार आहोत. यामुळे भविष्यात तुम्हाला चांगली नोकरी शोधण्यात मदत होईल. सध्या विद्यार्थ्यांसाठी अनेक शॉर्ट टर्म कोर्सेस उपलब्ध आहेत. हे कोर्स केल्यानंतर तुम्हाला सुरुवातीलाच चांगल्या पगाराची नोकरी मिळू शकते. याशिवाय तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसायही सुरू करू शकता. जाणून घ्या अशाच काही कोर्सेसबद्दल...


ॲनिमेशन (Animation) : 


हॉलिवूडपासून बॉलिवूडपर्यंत सर्वत्र ॲनिमेशन पाहायला मिळतं. अशा परिस्थितीत शॉर्ट टर्म ॲनिमेशन कोर्स करून विद्यार्थ्यांना चांगली नोकरी मिळू शकते. ॲनिमेटर्सना व्हिडीओ, गेम्स आणि डिझाइन कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. याशिवाय तुम्ही तुमचा स्वतःचा स्टार्टअप देखील सुरु करु शकता. भारतातील ॲनिमेटरचा सुरुवातीचा पगार सुमारे 40 ते 50 हजार रुपये मिळू शकतो.


वेब डिझाइन (Web Designing) : 


सध्या वेब डिझाइनची क्रेझ आहे. बारावीनंतर पदवीपासून पदवीपर्यंतचे विद्यार्थी कोणताही व्यक्ती हा अभ्यासक्रम करू शकतात. या कोर्सचा कालावधी किमान तीन महिने आहे. हा कोर्स पूर्ण केल्यानंतर, तुम्ही वेब डिझायनर म्हणून नोकरी मिळवू शकता किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता. भारतात वेब डिझायनरचा सुरुवातीला 40,000 ते 50,000 रुपयांपर्यंत पगार मिळू शकतो.


ज्वेलरी डिझायनिंग (Jewellery Designing) 


दागिने डिझाइन करणे हे कला असून फॅशनमधील सर्वात फायद्याचं करिअर ठरू शकतं. ज्वेलरी डिझायनिंगचा शार्ट टर्म अभ्यासक्रम तुमच्यासाठी खूप फायद्याचा ठरू शकतो. ज्वेलरी डिझायनर्सना ज्वेलरी एक्सपोर्ट हाऊसेस, ज्वेलरी डिझायनिंग हाऊसेस आणि फॅशन हाऊसेस अशा विविध क्षेत्रात रोजगाराच्या संधी आहेत. त्यांच्याकडे फ्रीलान्स डिझायनर म्हणून काम करण्याचा देखील पर्याय आहे. भारतात ज्वेलरी डिझायनर्सना सुमारे 30 ते 40 हजार रुपये पगार मिळतो.


फॅशन डिझायनिंग (Fashion Designing) : 


फॅशनमध्ये तुमची आवड कायम असल्यास तुम्ही फॅशन डिझायनिंगमध्ये चांगलं करिअर करू शकता. फॅशन डिझाईन कोर्समध्ये, विद्यार्थ्यांना फॅशन इंडस्ट्री तसेच डिझाइन पद्धतींची माहिती मिळेल. फॅशन डिझायनर्सना सुरुवातील सुमारे 30 ते 40,000 रुपये पगार आहे. पण, हा अभ्यासक्रम शॉर्ट टर्म नाही फॅशन डिझायनिंगमध्ये तुम्हाला पदवी किंवा डिप्लोला करता येतो.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Courses After SSC : दहावी पास झालात, आता पुढे काय? 'या' कोर्सेसमध्ये करिअर करण्याची संधी; वाचा सविस्तर...


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI