Special block of 14 hours between Jogeshwari - Goregaon : पुलाच्या कामासाठी आज रात्रीपासून जोगेश्वरी (Jogeshwari) - गोरेगावदरम्यान (Goregaon) 14 तासांचा ब्लॉक (Mumbai Local Meghablock) घेण्यात येणार आहे. आज (शनिवारी) रात्री 12 पासून रविवारी दुपारी 2 पर्यंत मेगाब्लॉक (Mumbai Local Megablock News) घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवरील (Western Railway) जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान पुलाच्या कामासाठी अप आणि डाऊन धीम्या मार्गावर आणि अप आणि डाऊन हार्बर मार्गावर मेगाब्लॉक (Megablock on Harbor Railway) घेण्यात येणार आहे. दरम्यान, या कालावधीत लोकलच्या वेळापत्रकात (Mumbai Local Schedule) अनेक बदल करण्यात आले असून काही लोकल रद्द (Mumbai Local Canceled) करण्यात आल्या आहेत. 


ब्लॉक कालावधीत पश्चिम रेल्वेवरील अंधेरी (Andheri) आणि गोरेगावदरम्यान (Goregaon News) अप आणि डाऊन जलद मार्गावरील सर्व लोकल धीम्या मार्गावरून चालवण्यात येणार आहेत. तसेच जलद मार्गावरील लोकलला प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्यामुळे लोकल राम मंदिर स्थानकावर (Ram Mandir Railway Station थांबणार नाहीत. ब्लॉक कालावधी मध्य रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या हार्बर मार्गावरील सर्व लोकल फक्त वांद्रे स्थानकापर्यंत धावणार आहेत. चर्चगेट-बोरिवलीच्या काही धीम्या लोकल अंधेरीपर्यंत धावणार आहेत.


जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान 14 तासांचा 'ब्लॉक'; लोकलचं वेळापत्रक काय? 



  • दुपारी 1.52 ची सीएएसएमटी-गोरेगाव लोकल रद्द करण्यात आली आहे. ब्लॉकपूर्वी डाऊन हार्बर मार्गावरील शेवटची लोकल सीएसएमटी गोरेगाव रात्री 11.54 वाजता सुटेल आणि रात्री 11.49 वाजता गोरेगावला पोहोचेल. अप हार्बर मार्गावरील शेवटची लोकल गोरेगावहून रात्री 11.06  वाजता सुटेल आणि रात्री 12.01 वाजता सीएसएमटी येथे पोहचेल.

  • ब्लॉक कालावधीत वांद्रे-गोरेगाव दरम्यान अप आणि डाऊन मार्गावरील हार्बर सेवा उपलब्ध राहणार नाहीत.

  • चर्चगेटवरून दुपारी 12.16 वाजता सुटणारी चर्चगेट-बोरिवली लोकल आणि दुपारी 2.50 वाजताची चर्चगेट-बोरिवली लोकल विरारपर्यंत धावेल.

  • बोरिवलीवरून दुपारी 1.14  आणि दुपारी 3.40 वाजता सुटणारी बोरिवली-चर्चगेट लोकल रद्द करण्यात आली आहे. त्याऐवजी विरार-चर्चगेट दुपारी 1.45 आणि दुपारी 4.15 वाजता दोन अतिरिक्त जलद लोकल धावतील.

  • ब्लॉकदरम्यान अप आणि डाऊन मेल/एक्स्प्रेस 10 ते 15 मिनिटं विलंबानं धावतील. तसेच राम मंदिर स्थानकावर अप आणि डाऊनला कोणतीही लोकल उपलब्ध नसेल. 


दरम्यान, पुलाच्या कामासाठी आज रात्रीपासून जोगेश्वरी-गोरेगावदरम्यान 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना प्रवास करताना होणाऱ्या अडथळ्यांमुळे आणि गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासन दिलगीरी व्यक्त केली आहे.