What To Do After SSC : तुम्ही इयत्ता 10 वी बोर्डाची परीक्षा पास झाला असाल, तर तुमच्या समोर सध्याचा सर्वात मोठा प्रश्न असेल, तो म्हणजे आता पुढे काय (List of Courses after 10TH SSC) करायचं. दहावी झाल्यानंतर काही जण आर्ट्स, कॉमर्स किंवा सायन्सला ॲडमिशन घेऊन बँकिंग किंवा मेडिकल क्षेत्राचा अभ्यासक्रम निवडतात. पण तुम्हाला यामध्ये इंटरेस्ट नसेल आणि काही वेगळं करिअर निवडायचं असेल, तर तशी तुम्हाला संधी आहे. दहावीनंतर करिअर करण्यासाठी सध्या अनेक पर्याय उपलब्ध आहेत.


दहावीनंतर विविध कोर्सेसमध्ये करिअर करण्याची संधी


दहावी पास झाल्यानंतर विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांसमोरही पुढे मोठं आव्हान असतं, ते म्हणजे करिअर काय निवडायचं. विद्यार्थ्यांना बँकिंग, मेडिकल, आयटीआय, इंजिनिअरिंग असे नेमके पर्याय उपलब्ध असल्यामुळे विद्यार्थ्यांवरही दडपण येतं. कोणतं करिअर निवडल्यावर नोकरी मिळेल हाही, प्रश्न असतो. पण ग्रॅज्युएशन आणि एमबीबीएस शिवायही अनेक अभ्यासक्रम आहे, ज्याद्वारे तुम्हाला उत्तम शिक्षण आणि नोकरी मिळवण्याची संधी आहे.


दहावीनंतर उपलब्ध असलेले वेगवेगळे अभ्यासक्रम कोणते जाणून घ्या.


दहावीनंतर पुढे काय करायचं ?



  • हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा (Diploma in Hotel Management)

  • पत्रकारिता डिप्लोमा (Diploma in Journalism)

  • ग्राफिक डिझायनिंग डिप्लोमा (Diploma in Graphic Designing)

  • डिप्लोमा इन फॅशन डिझायनिंग (Diploma in Fashion Designing)

  • फोटोग्राफी डिप्लोमा (Diploma in Photography)

  • मानसशास्त्र डिप्लोमा (Diploma in Psychology)

  • प्राथमिक शिक्षणाचा डिप्लोमा (Diploma in Elementary Education)

  • डिजिटल मार्केटिंग डिप्लोमा (Diploma in Digital Marketing)

  • फाईन आर्ट्स डिप्लोमा (Diploma in Fine Arts)

  • इंग्रजी भाषेत डिप्लोमा (Diploma in English)

  • डिप्लोमा इन वेब डिझायनिंग (Diploma in Web Designing)

  • डिप्लोमा इन गेम डिझायनिंग (Diploma in Game Designing)

  • डिप्लोमा इन ज्वेलरी डिझायनिंग (Diploma in jewellery Designing)

  • मेकअप आणि सौंदर्य डिप्लोमा (Diploma in Makeup and Beauty)

  • बेकरी आणि कन्फेक्शनरी मध्ये डिप्लोमा (Diploma in Bakery and Confectionery)

  • इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये डिप्लोमा (Diploma in Event Management)

  • इंजिनियरिंग डिप्लोमा (Diploma in Engineering)

  • मरीन इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Marine Engineering)

  • ॲनिमेशन मध्ये डिप्लोमा (Diploma in Animation)

  • डिप्लोमा इन टेक्सटाईल डिझायनिंग (Diploma in Textile Designing)

  • लेदर डिझायनिंग मध्ये डिप्लोमा (Diploma in Leather Designing)

  • टेक्सटाईल इंजिनीअरिंगमध्ये डिप्लोमा (Diploma in Textile engineering)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Maharashtra SSC Result 2023 : दहावीच्या निकालाबाबत आक्षेप आहे? गुणपडताळणी, पुनर्मूल्यांकन करायचंय? उत्तरपत्रिका मिळवायचीय? तर हे करा!


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI