मुंबई : आतापर्यत इयत्ता 8 ते 12 वी शाळा सुरू केल्यानंतर प्राप्त माहितीचा अहवाल शिक्षण विभागाकडून जाहीर करण्यात आला. यामध्ये 18 ऑगस्ट या एका दिवशी माहिती गोळा करून हा अहवाल तयार केलेला आहे. यामध्ये इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गात शिकणारे या दिवशी राज्यातील 15,12,404 विद्यार्थी शाळेत उपस्थित राहिले आहेत. तर राज्यभरात इयत्ता आठवी ते बारावी वर्गाच्या आतापर्यत 17,701 शाळा सुरू करण्यात आल्या असल्याची माहिती देण्यात आली आहे. 


ज्या शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात इयत्ता 8 वी ते 12 वी वर्गाचे एकूण विद्यार्थी 1,03,07,457 संख्या आहे. त्यातील फक्त 14.67 टक्के विद्यार्थ्यांनी शाळेत उपस्थित दर्शवली आहे. तर एकूण शाळेच्या संख्या लक्षात घेता 38.18 टक्के शाळा सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक शाळा अमरावती विभागात 2,282 शाळा सुरू करण्यात आल्या आहेत, त्यात यवतमाळ जिल्ह्यात 779 शाळा सुरू झाल्या आहेत. तर शाळेत उपस्थित राहणाऱ्या विद्यार्थ्यांची टक्केवारी ही लातूर विभागाची सर्वाधिक असून या विभागात 56.58 विद्यार्थ्यांनी उपस्थिती दर्शवली आहे. यामध्ये काही जिल्ह्यांची माहिती शिक्षण विभागाला आणखी प्राप्त होणे बाकी आहे.


17 ऑगस्टपासून राज्यात शाळा सुरु करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, कोविड टास्क फोर्सच्या सूचनेनंतर हा निर्णय शिक्षण विभागाला मागे घ्यावा लागला. त्यामुळे 15 जुलैपासून ज्या कोरोना मुक्त जिल्ह्यांमध्ये गावांमध्ये शाळा सुरू करण्यात आलेल्या आहेत. त्याठिकाणची सद्यस्थिती आणि आकडेवारी दर्शविणारा हा अहवाल आहे. अजूनही अनेक विद्यार्थी शाळा सुरू झालेल्या असताना सुद्धा शाळेत येत नसल्याचं या आकडेवारीवरून दिसत आहे. तर अनेक गावांमध्ये शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सुद्धा दिवसेंदिवस वाढताना दिसत असल्याचं या आकडेवारीतून समोर येत आहे. हा अहवाल आणि आकडेवारी शाळा सुरू करण्याबाबत राज्य सरकार विचार करेल तेव्हा महत्त्वाचा ठरणार आहे. जेणेकरून शाळा सुरू करण्याबाबतची पुढील दिशा राज्य सरकारला ठरवता येईल.


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI