मुंबई  : राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून कमी होऊ  लागली आहे. आज 4,365 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 384 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 21 हजार 305 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.97टक्के आहे. 


राज्यात आज 105 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.11 टक्के झाला आहे. तब्बल 37 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या  55 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  जळगाव (38), नंदूरबार (0),  धुळे (6), परभणी (15), हिंगोली (77),   नांदेड (44), अमरावती (89), अकोला (20), वाशिम (7),  बुलढाणा (29), यवतमाळ (9), वर्धा (6), भंडारा (4), गोंदिया (2),  गडचिरोली (30) या सोळा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 12, 558 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.


भिवंडी निजामपूर, धुळे,  परभणी, लातूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, नागपूर, गोंदिया या  जिल्ह्यात आज शून्य रुग्ण आढळले आहेत. तर अहमदनगरमध्ये सर्वाधिक 577 रुग्णांची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5, 19,21, 798 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64,15, 935 (12.36 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3,22,221 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 2, 745  व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. 


मुंबईत गेल्या 24 तासात 223 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 


मुंबईत गेल्या 24 तासात 223 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 322 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,19,381 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2,853 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2052 दिवसांवर गेला आहे. 


 देशात गेल्या 24 तासांत 36 हजार 571 नव्या कोरोनाबाधितांची नोंद


देशात जीवघेण्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी, धोका अद्याप टळलेला नाही. देशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 36 हजार 571 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 540 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात सध्या सक्रिय रुग्णांची संख्येत घट होऊन 3 लाख 63 हजार 605 वर पोहोचली आहे. जी गेल्या 150 दिवसांतील सर्वात कमी रुग्णसंख्या आहे. देशात आतापर्यंत देण्यात आलेल्या लसींच्या डोसची संख्या 57.16 कोटींच्या पार पोहोचली आहे. तर, गुरुवारी 48 लाखांहून अधिक डोस देण्यात आले आहेत