मुंबई : मुंबई हायकोर्टानं महाराष्ट्र सरकारनं शिक्षणाचा अधिकार म्हणजेच आरटीईमध्ये केलेल्या बदलांना स्थगिती दिली होती. हायकोर्टाच्या स्थगितीनंतर पालक आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला होता. हायकोर्टाच्या स्थगितीमुळं नोंदणी प्रक्रिया काही काळासाठी बंद करण्यात आली होती. शैक्षणिक वर्ष 2024-25 साठी  महाराष्ट्रातील आरटीईची प्रवेश प्रक्रिया शुक्रवार म्हणजेच 17 मे पासून पुन्हा सुरु होणार आहे. हायकोर्टाच्या निर्णयापूर्वी ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल करण्यात आले असतील त्यांनी पुन्हा नव्यानं अर्ज दाखल करावेत, असं सांगण्यात आलं आहे. 


मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरटीई प्रवेशासाठी 1 लाख जागा उपलब्ध आहेत. राज्य सरकारनं आरटीई नियमांमध्ये बदल करत सरकारी शाळांचा समावेश करुन जागा साडे नऊ लाख जागांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाला आक्षेप घेण्यात आला होता.



महाराष्ट्र सरकारनं राज्यात शिक्षणाचा अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीमधील नियमांमध्ये बदल केला होता. सरकारच्या नव्या नियमानुसार एखाद्या सरकारी अनुदानित प्राप्त शाळेच्य एक किलोमीटर परिघात खासगी शळा असल्यास त्या खासगी शाळेला आरटीई अंतर्गत जागा राखीव ठेवण्याचं बंधन राहणार नव्हतं. सरकारच्या नव्या निर्णयानुसार आरटीईमध्ये 75000 हजार सरकारी शाळांची वाढ होऊन उपलब्ध जागांची संख्या साडे नऊ लाख प्रवेशांपर्यंत गेली असती. 


मुंबई हायकोर्टानं राज्य सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली. यामुळं महाराष्ट्र सरकारला खासगी शाळांमधील 25 टक्के जागा आरटीईसाठी राखीव ठेवण्याच्या निर्णयाकडे परत जावं लागलं. खासगी शाळांमध्ये आर्थिक दृष्ट्या मागास असलेल्या विद्यार्थ्यांना आरटीईच्या 25 टक्के जागांवर प्रवेश दिला जातो. राज्य सरकार त्यांची फी शाळांना देत असते. 


आरटीई प्रवेशाच्या किती जागा?


राज्यात सध्या 9138 शाळांमध्ये आरटीईनुसार 1 लाख 2 हजार 434 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये 573 शाळा आरटीईच्या नियमात येतात तिथं 4441 जागा उपलब्ध आहेत. 


राज्य सरकारनं नियमात बदल केल्यानं आरटीई प्रवेश प्रक्रियेला उशीर झालेला आहे. राज्य सरकारनं बदलेल्या नियमानुसार 70 हजर जणांनी नोंदणी केली होती. मात्र, सर्वांना नव्यानं नोंदणी करावी लागणार आहे. शालेय शिक्षण (प्राथमिक) चे संचालक शरद गोसावी यांनी नवी  प्रवेश प्रक्रिया शुक्रवारपासून सुरु होणार आहे, अशी माहिती दिली. आता नव्यानं नोंदणी करावी लागणार असल्याचं त्यांनी म्हटलं.


संबंधित बातम्या :


मुंबई विद्यापीठात मंदिर व्यवस्थापनाचा अभ्यासक्रम, पुढील महिन्यापासून प्रवेश प्रक्रियेला सुरुवात


APAAR Card : विद्यार्थ्यांसाठी 'वन नेशन वन स्टुडंट आयडी' किती महत्त्वाचं? अर्ज कसा करायचा?


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI