मुंबई : दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाल्याशिवाय विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊ नका अशी मागणी करत हायकोर्टात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनं दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाच्या संकटामुळे महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतोय. अशात परीक्षा घेणं विद्यार्थ्यांसाठी व इतर कर्मचाऱ्यांसाठी धोकादायक असू शकतं. मात्र राज्य सरकारने परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान देत निवृत्त प्राध्यापक आणि पुणे विद्यापीठाचे माजी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी मुंबई उच्च न्यायालयात ही जनहित याचिका दाखल केली आहे.
राज्यात SSC बोर्डाच्या दहावीच्या परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षा होणार : शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड
राज्यात कार्यरत असलेल्या एसएससी, सीबीएसई, आयसीएसई आणि इंटरनॅशनल बोर्ड या विविध बोर्डांमध्ये एकवाक्यता नाही. केंद्र सरकार आणि राज्य सरकारही या परीक्षांच्या बाबतीत गोंधळलेली आहे. महाराष्ट्रात राज्य सरकार आधी परीक्षा घेण्यावर ठाम होते, मग ऐनवेळी परीक्षा रद्द केल्या. त्यातही फक्त दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द केल्या मात्र बारावी बोर्डाच्या परीक्षा घेणार असं जाहीर केलंय. तर अकरावीच्या विद्यार्थ्यांचं भवितव्य अंतर्गत गुणांवर ठरवणार आहेत. तर मग हे सारं करताना दहावीच्या परीक्षा रद्द करून सरकारनं काय साध्य केलं? असा थेट सवाल या याचिकेतून करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भविष्यावर याचा काय परिणाम होईल? याचा विचार हा निर्णय घेताना केलेलाच नाही, उलट प्रवेश प्रक्रियेत भ्रष्टाचार करण्याला मार्ग मोकळा करून दिला आहे, असा आरोपही या याचिकेतून करण्यात आला आहे.
Majha Vishesh : SSC च्या विद्यार्थ्यांचं मूल्यांकन कसं करणार? अकरावीच्या प्रवेशाचं काय? माझा विशेष
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा तसेच अकरावी प्रवेश प्रक्रियेत अधिक गोंधळ होऊ नये यासाठी दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाला तात्काळ स्थगिती देऊन या परीक्षा घेण्यात याव्यात अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. पुण्यातील निवृत्त प्राध्यापक धनंजय कुलकर्णी यांनी दाखल केलेल्या या याचिकेवर गुरुवारी सुनावणी घेण्यास हायकोर्टानं नकार दिल्यानं पुढील आठवड्यात दुसऱ्या खंडपीठापुढे यावर सुनावणी होणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Education Loan Information:
शिक्षण कर्ज ईएमआय कॅल्क्युलेट
Education Loan Information:
Calculate Education Loan EMI